धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

 परळीजवळ मोठी दुर्घटना: मलकापुर शिवारात रेल्वेने एका मेंढपाळासह 22 मेंढ्या 2 गुरे ठार



 परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा....

        परळी वैजनाथ पासून अगदी जवळच असलेल्या मलकापूर शिवारात मोठी भीषण दुर्घटना घडली असुन 22 मेंढ्या, दोन गुरे व एका मेंढपाळाचा या दुर्घटनेत रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना सकाळी १० वा. घडली आहे. या घटनेने परळी व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

      

        परळी शहरातील धनगर गल्ली येथील मधुकर सरवदे व मुंजा मुक्तीराम डोणे रा.उखळी,ह.मु.परळी हे दोघे रेल्वे पटरीने मेंढ्या चारण्यासाठी जात होते. रविवार दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आपल्या मेंढ्या चारण्यासाठी परळी-हैद्राबाद रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापुर शिवारात समोरुन आलेल्या मालगाडीने मेंढ्या,दोन जनावरांना चिरडले.दोन्ही बाजुने डोंगर असल्याने बचावासाठी वेळच मिळाला नसल्याने मेंढपाळ मुंजा डोणे हे देखील या दुर्घटनेत सापडुन ठार झाले.या दुर्घटनेत सरवदे यांच्या 22 मेंढ्या व दोन जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार