अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS:महात्मा बसवेश्वरांची वचने अमलात आणण्याची गरज- प्रा. डॉ राजशेखर सोलापूरे यांचे प्रतिपादन

 महात्मा बसवेश्वरांची वचने अमलात आणण्याची गरज- प्रा. डॉ. राजशेखर सोलापूरे यांचे प्रतिपादन


परळी वैजनाथ दि. 30 (प्रतिनिधी) - थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये  त्यांच्या वचन साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. त्यांनी त्यांच्या वचनांतून माणसाने कर्मकांडे नाकारून विज्ञानवादी व्हावे असा मंत्र दिला. आजच्या काळातही त्याची ही शिकवण अंगीकारण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन लातूर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ.राजशेखर सोलापूरे यांनी केले.

                              शहरातील थर्मल कॉलनी मधील सार्वजनिक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवार दि.30 रोजी राम मंदिर येथे महात्मा बसवेश्वर महाराजांच्या 892 व्या जयंतीनिमित्त व्याख्यान व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. 

                               कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता एच. के. अवजारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरुजी, कल्याण अधिकारी दिलीप वंजारे, लोकमत टाईम्स चे पत्रकार प्रा. राजू कोकलगावे व सामाजिक कार्यकर्ते ऍड. मनोज संघ आहे हे उपस्थित होते.

                                पुढे बोलताना  सोलापुरे यांनी सांगितले की, महात्मा बसवण्यांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून जगातली पहिली संसद निर्माण केली होती ‌. त्यांनी अनिष्ट चालीरीती व  कर्मकांडांवर कडकडून प्रहार केला ‌. तसेच त्यांनी कोणत्याही जाती-धर्माला थारा दिला न देता ज्याच्या गळ्यात लिंग तो लिंगायत असा नारा दिला. कायकवे- कैलास या वचनातून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ते म्हणाले की,लिंगायत पंथ मानणाऱ्यांना दगडांमध्ये देव शोधण्याची किंवा काशी यात्रेला जाण्याची गरज नाही कारण बसवण्यांनी देवालाच इष्ट लिंगाच्या माध्यमातून                    कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवराज स्वामी यांनी केले. याप्रसंगी कल्याण अधिकारी दिलीप वंजारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय समारोपातून उपमुख्य अभियंता अवचार यांनी अशा प्रकारच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमांतून समाजाचे प्रबोधन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करून जयंती उत्सव  समितीच्या सलग तिसऱ्या वर्षाच्या यशस्वी उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन बनसिद्ध म्हेत्रे यांनी केले

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सोमेश्वर कस्तुरे, कैलास एसके, हाळीघोंगडे,किशोर फुलारी,मुकेश पटणे, दिंडोरे, नवनाथ पाटील, कपिल नाईकवाडे ,अभिमन्यू शिंदे,बालाजी गित्ते,शंकर नागरगोजे,प्रसाद निर्मळे, महेश बुरांडे आदींनी परिश्रम घेतले.  शहरातील महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?