अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS:ॲड.माधव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे धडाकेबाज उद्घाटन

 विधानसभा निवडणुकीत परळी सह संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार - छत्रपती संभाजी राजेंची मोठी घोषणा




ॲड.माधव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे धडाकेबाज उद्घाटन


परळी मतदारसंघात परिवर्तनाची गरज - ॲड.माधव जाधव


*■छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांचा वंशज असल्या कारणाने आपण माझा मान सन्मान केला,वंशज असल्याचा मला सार्थ अभिमान■*



परळी/प्रतिनिधी दि.३० - पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष परळी सह संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार असल्याची मोठी घोषणा युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.परळीत ॲड.माधव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली.परळी विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर स्वराज्य पार्टीत या अस आवाहन देखील छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी केलं आहे.या जाहीर सभेआधी शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य रॅली काढण्यात आली.या रॅलीसाठी आज रस्त्यावर जनसागर ऊसळलेला दिसून आला.यावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी राजेंचे उस्फुर्तपणे स्वागत केले.ही रॅली २ तासानंतर सभेस्थळी पोचली.


वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या हालगे गार्डन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ॲड.माधव (आप्पा) जाधव यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी छत्रपती संभाजी राजे बोलत होते.यावेळी ते म्हणाले की अँड. माधव जाधव यांनी धाडस केल्यास इथेही स्वराज्य स्थापन होऊ शकते.स्वराज्य संघटनेच्या कामावर त्यांनी लक्ष केंद्रीत करावं.छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांचा वंशज असल्या कारणाने आपण माझा मान सन्मान केला,वंशज असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यास रायगडला उपस्थित रहा असे आवाहनही त्यांनी केले.माधव जाधव यांनी स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवावी असे आवाहन छत्रपती संभाजी राजांनी अँड. माधव जाधव यांना केले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर झालेल्या भाषणात ही प्रभू वैद्यनाथांची परळी आहे.आधी हे शहर मोठी बाजारपेठ म्हणून नावाजलेले होते.विशेष म्हणजे १९८५ पासून येथे अनेक सत्तास्थाने राहिले आहेत गृहमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते आणि कॅबिनेट मंत्री अशा दर्जांची मंत्रिपदे या शहराला लाभल्यामुळे कोट्यावधी रुपयाचा निधी मिळालेला आहे.परंतु ही सर्व कामे बोगस होत असल्यामुळे परळी शहर किंवा परिसराचा अद्यापही विकास दिसत नाही.इतकेच काय तर येथील दहशतीमुळे या शहरातील उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद पडत आहेत.बेरोजगारांना रोजगारासाठी इतर शहरांमध्ये स्थलांतर करावे लागत आहे.तर आपल्या कुटुंबाच्या सरंक्षणामुळेही होणारे स्थलांतर रोखण्यासाठी  आता तुम्हा आम्हाला परिवर्तन करण्याची गरज आहे.यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मला साथ द्या असे आवाहन ॲड.माधव जाधव यांनी केले.


सभेआधी परळीत नव्याने सुरू करण्यात आलेल्या मोंढा परिसरातील माधव भवन येथे ॲड.माधव जाधव मित्र मंडळ यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.याआधी उदघाटन कार्यक्रमाआधी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले गेले आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात झाली पुढे,रेल्वे स्टेशन परिसर,स्टेशन रोड,गोलाई,राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक,नेहरू चौक,या मार्गे हालगे गार्डन येथे रॅली पोचली.हालगे गार्डन येथे या उदघाटन समारंभासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली.


सभेस्थळी मान्यवरांचे भाषण झाले,परळीत सुरू असलेले राजकरण सर्वांना माहीत आहे असे शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट म्हणाले. छत्रपती संभाजी राजे व बाळासाहेब आंबेडकर हेच राज्याला दिशा देऊ शकतात असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केले.मैत्री करणारे आणि मित्रत्व निभवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अँड. माधव जाधव आहेत,या कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहून काही लोकांच्या पोटात गोळा उठला असणार असे माजी सभापती जि.प.समाजकल्याण प्रभाकर वाघमोडे यांनी केले.यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर वाघमोडे,प्रमुख अतिथी म्हणून माणिकराव कदम,कालिदास आपेट,अशोक हिंगे,महेंद्र निकाळजे,दत्ताभाऊ गव्हाणे,मिलिंद घाडगे, व्यंकटेश शिंदे,शेख शरीफ भाई,शिवाजी शिंदे,नरेश हालगे,श्रीकांत पाथरकर,देवराव लुगडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जाधव तर आभार प्रदर्शन सेवकराम जाधव यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव जाधव मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



-  क्षणचित्रे - 


छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांचा वंशज असल्या कारणाने आपण माझा मान सन्मान केला,वंशज असल्याचा मला सार्थ अभिमान आहे


छत्रपती संभाजी राजे यांची रॅली काढण्यात आली यावेळी नागरिकांनी ठिकाठिकाणी त्यांचे स्वागत केले. 


दुष्काळ ओला दुष्काळ गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती संदर्भात शेतकऱ्यांसाठी दृष्टीकोनातून निर्णय घेणे गरजेचे आहे..


मराठा आरक्षण -  जोपर्यंत मराठा समाज सामाजिक मागास सिद्ध होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा कसलाही विचार करू नका.


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय सुरू हे फक्त वेट अँड वॉच पाहत आहोत... त्यातून शिकत आहोत अस म्हणत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?