MB NEWS:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडीयेथील विद्यार्थिनीचे इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षेत यश
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थिनीचे इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षेत यश
मिरवट केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे ५ व्या वर्गात शिकणाऱ्या कुमारी सुजाता धनराज दहिफळे हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवले असून तिला पात्र घोषित करण्यात आले आहे. मागील वर्षी याच शाळेची विद्यार्थिनी इयत्ता ८ वी स्कॉलरशिप मध्ये पात्र झाली, त्यानंतर सलग यश मिळवणारी या शाळेची ही दुसरी विद्यार्थिनी आहे. शाळेतील शिक्षकांसह माय व्हिजन नवोदय ऍडमिशनचे श्री संतोष सुतार, श्री धनराज परगे व श्री गोवर्धन शिंदे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. श्री संतोष फड यांच्या ThinkSharp Foundation ने पुरवलेल्या टॅबचाही तिला अभ्यासात मोठा फायदा झाल्याचे तिने सांगितले.
तिच्या या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी श्री कनाके, केंद्रप्रमुख श्रीमती मिश्रा, केंद्र मुख्याध्यापक श्री हडबे, सरपंच श्री बंडू गुट्टे, मुख्याध्यापक श्री राठोड, शालेय समिती अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे, उपाध्यक्ष श्री हनुमान देवकते यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षकवृंदानी तिचे अभिनंदन केले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये घेतलेले क्लास, दर महिन्याला घेतली जाणारी सराव परीक्षा, दोन वर्ष आधीपासूनच केलेली तयारी, नगदी बक्षीसांमधून मिळणारे प्रोत्साहन सर्वांचा परिणाम आता हळूहळू दिसत असल्याचे शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांनी सांगितले
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा