पोस्ट्स

जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

MB NEWS- विधान परिषदेत स्वपक्षाकडून बीडच्या या दिग्गजांना मिळेल संधी?

इमेज
  बीडमधील क्षीरसागर-मुंडे ओबीसी नेत्यांना विधान परिषदेची मिळू शकते संधी मंत्री आणि विरोधी पक्षनेते पद सुद्धा शक्य ? परळी वैजनाथ...... ओ बीसी आरक्षणाचा विषय मागील अनेक वर्षापासून चर्चेत असतो. आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल परंतू आरक्षणासाठी मात्र विविध राजकिय पक्षातील नेते मंडळी या प्रश्नांवर धावतांना व संघर्ष करतांना दिसून येतात. बीडचे शिवसेनेेचे जयदत्तअण्णा क्षीरसागर व भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हे दोघे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी ओबीसी नेतृत्व म्हणून ते नेहमीच पुढे आलेले दिसून येतात. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर लवकरच होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या रिक्त जागेवर या दोन्ही नेत्यांना आपआपले पक्ष संधी देवू शकतात. एवढेच नाही तर विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर शिवसेनेकडे रिक्त असलेल्या मंत्रीपदावर शिवसेनेकडून जयदत्तअण्णा क्षीरसागर तर एक आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून सौ.पंकजाताई मुंडे यांना भाजप सभागृहात संधी देवू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात ओबीसीच्या आरक्षणाचा विषय सध्या अत्यंत कळीचा विषय ठरत असून निवडणूका आरक्षणासोबत होणार किंवा आरक्षण विरहीत होणार यावर सध्

MB NEWS-आकाशवाणी,एफ.एम.केंद्र निर्मितीसाठी खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन-चेतन सौंदळे

इमेज
  आकाशवाणी,एफ.एम.केंद्र निर्मितीसाठी खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन-चेतन सौंदळे परळी वैजनाथ /प्रतिनिधी...         भारतातील बारा ज्योतीर्लिंगापैकी श्री.वैजनाथ पाचवे ज्योतीर्लिंग परळी वैजनाथ येथे तर महाराष्ट्रातील श्री.योगेश्वरी देवीचे प्रसिध्द मंदीर शैक्षणिक वारसा लाभलेल्या अंबेजोगाई येथे आहे.याठिकाणी देशभरातून भाविक-भक्त व प्रवाशी मोठया प्रमाणात येतात तसेच परळी-अंबेजोगाई धार्मिक,पुरातत्व,सांस्कृतिक, सामाजिक,एैतिहासिक,औद्योगिक व राजकीय दृष्टया मराठवाडयातील महत्तवाची शहरे आहेत परंतू याठिकाणी ईतर एफ एम केंद्राचे प्रसारण स्पष्ट ऐकू येत नाही त्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम,रेडीओ मिर्ची तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय यांना शिफारस करण्याची मागणी बीड-परभणी जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे परळी दौ-या निमित्त आले असताना निवेदनाद्वारे केली आहे.  यावेळी रा.कॉ.पार्टीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख,उपनगराध्यक्ष शकील कुरेश

MB NEWS-खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!

इमेज
  खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे सध्या राज्यात विविध ठिकाणी दौरा करत आहेत.या दौऱ्यात सोनपेठ येथील मेळाव्यावरुन आज सायंकाळी त्या परळीमार्गे जात असताना त्यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले.         दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गडावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे आल्या.गड आशेचा,गड उर्जेचा,गड प्रेरणेचा अशी ख्याती असलेल्या गोपीनाथ गडावर अनेक नेते या भागात आल्यानंतर आवर्जून भेट देतात व लोकनेत्याच्या लोकोत्तर कार्याचे स्मरण करत नतमस्तक होतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे सध्या राज्यात विविध ठिकाणी दौरा करत आहेत. सोनपेठ येथील कार्यक्रमावरुन लातुरकडे त्या परळीमार्गे जात असताना त्यांनी गोपीनाथ गडाला भेट दिली.दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पण करून त्यांनी दर्शन घेतले.यावेळी त्यांच्या समवेत आ.संजय दौंड, न.प.गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांच्या सह राष्ट्

MB NEWS- *पंकजाताई मुंडेंच्या हस्ते श्रीक्षेत्र नारायण गडावरील महंतांच्या निवास वास्तूचे थाटात पूजन*

इमेज
 *पंकजाताई मुंडेंच्या हस्ते श्रीक्षेत्र नारायण गडावरील महंतांच्या निवास वास्तूचे थाटात पूजन* *पायरी बनून गडाची सेवा करता आली हे माझं भाग्यच - पंकजाताई*  _जातपात न मानता जिल्हयाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले_ *पंकजाताई तुमच्या 'ताई' पण आमच्यासाठी मात्र 'आई' - महंत शिवाजी महाराजांनी केला गौरव* बीड  ।दिनांक २७। दुधापेक्षा दूधावरची 'साय' जशी महत्वाची तसं लेकीपेक्षा 'नात' महत्वाची असते, तसं माझं आणि गडाचं नातं आहे. पायरी बनून गडाची सेवा मला करता आली हे मी माझं भाग्य समजते. गडाचं बदललेलं रूप, झालेली कामे आणि वास्तू पाहून आनंद वाटला. नगद नारायणाच्या आशीर्वादाने  भविष्यातही गडाची अशीच सेवा माझ्या हातून निश्चित होईल असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी श्रीक्षेत्र नारायण गड येथे व्यक्त केला. दरम्यान,  पंकजाताई हया तुमच्यासाठी 'ताई' असल्या तरी आमच्या मात्र 'आई' आहेत, नगद नारायणाचा आशीर्वाद त्यांच्या पाठिशी सदैव राहील. असेच प्रेम कायम रहावे अशा शब्दांत गडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी आशीर्वाद दिले.   महाराष्ट्राची ध

MB NEWS- पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'.........!

इमेज
   पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'..... मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा : पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य बीड, प्रतिनिधी...            मी जनतेच्या प्रश्नांवर गेली अनेक वर्ष लढत आहे. आता राज्यात विधान परिषदेच्या १० जागांवर निवडणूक पार पडत आहे. अशावेळी मला विधान परिषदेवर पाठवावं, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात. पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते, (शिवसेना) प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (सर्व भाजप) संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार या प्रमाणे नव्या रचनेनुसार आमदार निवडून येतील.          सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि राज्यात तापलेल्या ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे.

MB NEWS-शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त आयोजित रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद

इमेज
  शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त आयोजित रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद ३५ युवक व महिलांनी केले रक्तदान परळी वैजनाथ दि.२७ (प्रतिनिधी)            प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनि मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त आयोजित रक्तदान शिबीरास युवक व महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी ३५ जणांनी रक्तदान केले.           येथील श्री.शनि मंदिरात गेल्या तीस वर्षांपासून शनैश्वर जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मागील दोन वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आल्याने आपापल्या घरी जन्मोत्सव साजरा करावा लागला होता. यंदा सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने येथे मोठ्या उत्साहात शनैश्वर जन्मोत्सव साजरा होत आहे. जन्मोत्सवा दरम्यान रक्तदान शिबीराचे शुक्रवारी (दि.२७) आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरास युवकांसह, महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी ३५ युवक व महिलांनी रक्तदान केले. रक्त संकलन करण्याचे काम स्वामी रामानंद तीर्थ रक्तपेढी आंबेजोगाई येथील डॉक्टरांच्या टिमने केले. त्यांचेही यासाठी सहकार्य लाभले. हे देखील

MB NEWS-दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन

इमेज
  दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन    परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे सध्या राज्यात विविध ठिकाणी दौरा करत आहेत.या दौऱ्यात ठिकठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने त्यांना भेटायला व स्वागताला येत आहेत.दरम्यान आपल्याला भेटायला येणारांना खा.सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.काही वेळापुर्वीच एक ट्विट करत त्यांनी हे आवाहन केले आहे.      खा.सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर आवाहन करतांना म्हटले आहे की, राज्याच्या दौऱ्यावर असताना भेटायला येणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबियांवरील प्रेमापोटी विविध भेटवस्तू आणतात. यामध्ये पुष्पगुच्छ, हारतुरे, छायाचित्रे, फोटो फ्रेम आदींचा समावेश असतो. हे आपल्या प्रेमाचं प्रतिक आहे.आपल्या या निखळ भावना आणि प्रेमाबद्दल आम्ही सर्वजण कृतज्ञ आहोत. परंतु माझी आपणास नम्र विनंती आहे की, भेटवस्तू आणायच्या असतील तर कृपया त्या पुस्तकांच्या स्वरुपात आणाव्या. पुस्तकांमुळे खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रसार होतो.आपण भेट दिलेली पुस्तक

MB NEWS-बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचा विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

इमेज
  बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचा विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          परळी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी व सातत्याने पाठपुरावा करून अद्यापही आशा वर्कर्सच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.त्यामुळे बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियनने विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.          याबाबत  तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती कार्यालय,परळी वैजनाथ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संघटनेने आपल्याला अनेकवेळा विनंत्या करूनही आशा वर्कर्स च्या मागण्या बाबत तालुका आरोग्य अधिकारी व कार्यालयाकडे नेहमी उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या  अद्यापही पुर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव संघटनेला आंदोलन करण्याची वेळ आली आहे.कोवीड लसीकरण मोबीलायझेशन भत्ता मार्च-२०२१ पासुन देण्यात यावा.,आरोग्य वर्धीनी मानधन देण्यात यावे.,१५०० रू. वाढ जुलै २०२१ पासुन देण्यात यावी., कुष्ठरोग मानधन देण्यात यावे. कोवीड भत्ता १००० /- रू प्रमाणे ६ महिन्याचा मिळावा. पल्स पोलिओचे मानधन मि

MB NEWS-पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा-रामेश्वर मुंडे

इमेज
  पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा-रामेश्वर मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सध्या विविध ठिकाणच्या गंगा पात्रातून वाळूचा अवैध उपसा सध्या मोठया प्रमाणावर सुरू आहे, हा उपसा बेकायदेशीर रित्या सुरू आहे. नियमानुसार उपसा सुरू होत नाही बेकायदेशीर होणाऱ्या वाळू उपसा तात्काळ थांबवून  कडक कारवाई करावी अशी मागणी  युवा नेते,तथा सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर मुंडे यांनी केली आहे.             तालुक्यातील मौजे पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातील वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करून बुडवलेला महसूल वसूल करावा, तालुक्यातील गंगा पात्रातून सध्या वाळूचा अवैध उपसा व वाहतूक मोठया प्रमाणावर होत असून शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवला जात आहे.  पोलिस व महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार होत आहे. हा वाळू उपसा थांबवावा यासाठी  अनेक वेळा तक्रारी, उपोषणही केले, पण पोलिस व महसूल प्रशासन कारवाई करण्याचे धाडस करत नाहीत. गोदावरी गंगा पात्रातील उपसा केलेल्या वाळूचे तात्काळ पंचनामे करावेत, बाहेरील जिल्हयाच्या अधिकाऱ्यांची टीम नियुक्त करून अवैध वाळ

MB NEWS-साहेबांचा २६ मे ते ३ जूनचा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू...

इमेज
३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत साहेबांचा २६ मे ते ३ जूनचा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू... परळी ।दिनांक २६।  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा स्मृतिदिन येत्या ३ जून रोजी आहे. हा दिवसच मुळात सर्व सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी असतो, एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय जात नाही. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज फेसबुक पोस्ट करत "गोपीनाथ गडाचं" प्रोफाईल ठेवण्याचं आवाहन करत साहेबांचा २६ मे ते ३ जून चा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू असं म्हटलं आहे.     मुंडे साहेबांचं समाधीस्थळ असलेल्या "गोपीनाथ गडाचं" प्रोफाईल चित्र पोस्ट करत पंकजाताई मुंडे यांनी त्या चित्राच्या खाली " संघर्ष की बडी-बडी व्याखाएं कर रहे थे सभी । मैंने पिता लिखकर सब को मौन कर दिया..। अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, २६ मे... संघर्ष आपल्या सर्वांचा.. आणि आपला विश्वास शपथ घेत होता मोदींजींच्या मंत्रिमंडळात... ३ जून पर्यंत हे प्रोफाईल ठेवू आणि साहेबांचा २६ मे ते ३ जून चा आपल्या अपेक्

MB NEWS-मुख्याधिकारी यांच्या भेटीची आठवड्यात चार तास वेळ म्हणजे नागरिकांची चेष्टा-नितीन समशेट्टे

इमेज
  मुख्याधिकारी यांच्या भेटीची आठवड्यात चार तास वेळ म्हणजे नागरिकांची चेष्टा-नितीन समशेट्टे परळी वैजनाथ, प्रतिनिधी..  शहरातील नागरिक नगर परिषदेच्या अकार्यक्षम कामकाजामुळे आधीच त्रस्त आहेत त्यात नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी नागरिकांना भेटण्यासाठी आठवड्यातील फक्त 4 तास वेळ देण्याचा निर्णय म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचा आरोप भाजपाचे नितीन समशेट्टे यांनी केला आहे.       सध्या नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्यामुळे मुख्याधिकारीच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळीत आहेत. नवीन आलेल्या मुख्याधिकार्यांनी चार्ज घेतल्यानंतर शहरात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी नागरिकांना भेटण्यासाठीच बंधने टाकली आहेत. आठवड्यातील फक्त सोमवार आणि मंगळवार याच दिवशी 4 त 6 याच वेळेत भेटावे असा  निर्णय आपल्या कार्यालयाच्या बाहेर लावला आहे.ही  नागरिकांची केलेली चेष्टाच आहे. हा आदेश त्वरित मागे घ्यावा व नागरिकांच्या समस्या दूर करून त्यांना सुविधा देण्यासाठी वेळ द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे नितीन समशेट्टे यांनी दिला आहे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

MB NEWS-अतिरिक्त ऊसप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - कॉ अजय बुरांडे

इमेज
  अतिरिक्त ऊसप्रश्नी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - कॉ अजय बुरांडे परळी / प्रतिनिधी     मे अखेर शिल्लक राहिलेल्या ऊसाचे पंचनामे करून एक्करी ४० टनाचा उतारा गृहीत धरून एफआरपी प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने मंगळवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात अतिरीक्त उसधारक शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन कॉ अजय बुरांडे यांनी केले आहे.  १ एप्रिल नंतर गाळप झालेल्या व ३० मे अखेर शिल्लक राहिलेल्या ऊसासोबतच गाळपास दिरंगाई झाल्यामुळे ३२ मार्च नंतर गाळप करण्यात आलेल्या सर्व ऊसाला प्रति टन पाचशे रुपये नुकसान भरपाई द्यावी.३१ मे अखेर शिल्लक राहणाऱ्या ऊसाचा सर्वे करून प्रती एकर ४० टन वजन उतारा पकडून खरीप पेरणीसाठी ३० जून पर्यंत एफआरपी प्रमाणे एकरकमी नुकसान भरपाई देण्यात यावी.ऊस वाहतुकीसाठी पन्नास किलोमीटरच्या पुढे प्रती टन प्रती किमी पाच रुपये या प्रमाणे घोषित निर्णयाच्या वितरणाची अंमलबजावणी करावी. वेळेवर ऊस न गेल्याने वेळेत पीककर्ज फेड न होऊ शकलेल्या व्याज माफीपासून वंचित राहाव