MB NEWS-पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा-रामेश्वर मुंडे

 पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा-रामेश्वर मुंडे



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सध्या विविध ठिकाणच्या गंगा पात्रातून वाळूचा अवैध उपसा सध्या मोठया प्रमाणावर सुरू आहे, हा उपसा बेकायदेशीर रित्या सुरू आहे. नियमानुसार उपसा सुरू होत नाही बेकायदेशीर होणाऱ्या वाळू उपसा तात्काळ थांबवून  कडक कारवाई करावी अशी मागणी  युवा नेते,तथा सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर मुंडे यांनी केली आहे. 

           तालुक्यातील मौजे पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातील वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करून बुडवलेला महसूल वसूल करावा, तालुक्यातील गंगा पात्रातून सध्या वाळूचा अवैध उपसा व वाहतूक मोठया प्रमाणावर होत असून शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवला जात आहे.  पोलिस व महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार होत आहे. हा वाळू उपसा थांबवावा यासाठी  अनेक वेळा तक्रारी, उपोषणही केले, पण पोलिस व महसूल प्रशासन कारवाई करण्याचे धाडस करत नाहीत. गोदावरी गंगा पात्रातील उपसा केलेल्या वाळूचे तात्काळ पंचनामे करावेत, बाहेरील जिल्हयाच्या अधिकाऱ्यांची टीम नियुक्त करून अवैध वाळू साठयांवर छापे मारून त्याचे ऑडिट करावे तसेच  वाळू माफियाला सहकार्य करणाऱ्या महसूल व पोलिस, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी आणि सध्या सुरू असलेला अवैध वाळू उपसा तातडीने थांबविणेसाठी संबंधित यंत्रणेला लगेचच सूचना द्याव्यात, अवैध वाळू उपसा विरोधात आंदोलन, उपोषण करणारांना माफियांपासून सुरक्षा व संरक्षण देण्याची गरज आहे. याकडे पोलिस महसूल विभागाने सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर येते. विशेष म्हणजे नदीपात्रातून  वाळूचा उपसा केला जातो. तर वाळूची वाहतूक होत असताना महसूल पोलिस विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू चोरीमुळे माफियांचे फावले आहे. तर शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. याची दखल घेत त्वरीत वाळू चोरट्यांविरूध्द कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, महसूल मंत्री व विभागीय आयुक्तांनी याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची युवा नेते रामेश्वर म़ुंडे यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !