MB NEWS- विधान परिषदेत स्वपक्षाकडून बीडच्या या दिग्गजांना मिळेल संधी?

 बीडमधील क्षीरसागर-मुंडे ओबीसी नेत्यांना विधान परिषदेची मिळू शकते संधी



मंत्री आणि विरोधी पक्षनेते पद सुद्धा शक्य ?

परळी वैजनाथ......

बीसी आरक्षणाचा विषय मागील अनेक वर्षापासून चर्चेत असतो. आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल परंतू आरक्षणासाठी मात्र विविध राजकिय पक्षातील नेते मंडळी या प्रश्नांवर धावतांना व संघर्ष करतांना दिसून येतात. बीडचे शिवसेनेेचे जयदत्तअण्णा क्षीरसागर व भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हे दोघे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी ओबीसी नेतृत्व म्हणून ते नेहमीच पुढे आलेले दिसून येतात. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर लवकरच होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या रिक्त जागेवर या दोन्ही नेत्यांना आपआपले पक्ष संधी देवू शकतात. एवढेच नाही तर विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर शिवसेनेकडे रिक्त असलेल्या मंत्रीपदावर शिवसेनेकडून जयदत्तअण्णा क्षीरसागर तर एक आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून सौ.पंकजाताई मुंडे यांना भाजप सभागृहात संधी देवू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.


महाराष्ट्रात ओबीसीच्या आरक्षणाचा विषय सध्या अत्यंत कळीचा विषय ठरत असून निवडणूका आरक्षणासोबत होणार किंवा आरक्षण विरहीत होणार यावर सध्या मत मतांतरे चालू आहेत. ओबीसी आरक्षण देतांना सर्वांनाच सामावून घ्यायचे असल्याने यावर निर्णय घेतांना सर्वच राजकिय पक्षांना अडचण होत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या काही जागांवर आपआपल्या पक्षातील ओबीसी नेतृत्व पुढे करून त्यांना संधी देत आरक्षणाचा मुद्दा काहीसा शांत करण्याचा प्रयत्न केला जावू शकतो.


बीड जिल्हयात माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर हे शिवसेनेत असून त्यांना तसेच माजी मंत्री भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हे दोघे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष ओबीसी नेते आहेत या पार्श्वभूमीवर दोघांना विधान परिषदेवर घेवू शकतात. क्षीरसागर आणि मुंडे यांचा एकुण अनुभव लक्षात घेता भाजप आणि शिवसेनेला या नेतृत्वाची गरज असून ओबीसीच्या प्रश्नावर त्यांची चालू असलेली चळवळ लक्षात घेवून त्यांना उमेदवारी दिली जावू शकते. अर्थातच उमेदवारी नंतर दृष्टीपथातील विजय लक्षात घेता पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणूनही संधी मिळू शकते. सध्याचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे सुद्धा लवकरच निवृत्त होत असल्याने आणि सभागृहात सत्ताधार्‍यांच्या विरोधात आक्रमकपणे लढा देण्यासाठी पंकजाताई मुंडे या उपयुक्त ठरू शकतात. जयदत्तअण्णा क्षीरसागर यांचाही अनुभव मोठा असून त्यांनाही विधान परिषदेनंतर मंत्रीमंडळात काम करण्याची संधी दिली जावू शकते. अर्थातच हा निर्णय त्या त्या पक्षाचा असला तरी जिल्हयात मात्र या दोन्ही नावाभोवती आजही राजकारण चालत आहे. ही बाब लक्षात घेता येत्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधी आयती चालून येवू शकते.

अनुभवाचा फायदा होईल......

         जयदत्तअण्णा क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रदीर्घकाळ मंत्रीमंडळात कार्यरत होते. त्यांचा मंत्रीपदाचा अनुभव आता शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेवू शकणार आहेत. दुसरीकडे पंकजाताई मुंडे यांची मंत्रीपदाची पाच वर्ष मोठया अनुभवाची असून ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी तत्कालीन मंत्रीमंडळावर चांगली छाप सोडली होती. सोबतच त्या सत्ताधारी पक्षाला वेळोवेळी आपल्या आक्रमक भाषणाने सळो की पळो करू शकतील अशी त्यांची क्षमता आहे. या दोन्ही बाबी लक्षात घेता क्षीरसागर आणि मुंडे यांच्या अनुभवाचा फायदा त्या त्या पक्षाला होणार आहे.

------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• *खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!*

• *पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'.........!*

• 🔘 दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन

• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार