पोस्ट्स

आदिवासी समाज विकास मंचच्या बीड जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधरे

इमेज
  आदिवासी समाज विकास मंचच्या बीड जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधरे परळी (प्रतिनिधी) आदीवासी समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या आदिवासी समाज विकास मंच या संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी परळी येथील सामाजीक कार्यकर्ते शंकर गंगाधरे यांची निवड झाली असुन याबाबत संघटनेच्या पदाधिकार्यांनी नियुक्तीपत्र देवुन बीड जिल्ह्यात संघटनेचे काम करण्याच्या सुचना दिल्या.  आदिवासी समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ स्वामी,उपाध्यक्ष बागेश्वर इंद्रोले,सचिव सौ.उज्वला साबळे,कार्याध्यक्ष रंजनिकांत बंडलू, सचिन आनंदे,सल्लागार किशोर स्वामी,राधेश्याम शडमल्लु,मार्गदर्शक,कन्हैय्यालाल गुरवे,सदस्य नरेश अंटल्ले,सौ. कामिनी कोडगट्टी,गणेश पवार आदींनी बीड जिल्हाध्यक्ष पदाचे शंकर गंगाधरे यांना नियुक्तीपत्र दिले.आदिवासी समाजासाठी केलेले कार्य हे निश्चितच समाजाच्या कामी आलेले आहे.भविष्यातही सामाजिक कार्याचा वसा व वारसा घेऊन आपण आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टिने सामाजिक कार्य करणार आहात. आतापर्यंत आदिवासी जमातीसाठी केलेले उल्लेखनीय कार्य पाहून व  बिस्सामुंडा,विर एलव्य,राघोजी भांगरे,तंट्या भिल व उमा नाईक, नरसिम्हा रेड्डी या आद
इमेज
  राज्याचे कृषिमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संतोष मुंडे,राजेश्वर आबा चव्हाण, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या उपस्थित 87 दिव्यांगांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या कर्ज फॉर्म चे वाटप  शेवटच्या श्वासापर्यंत दिव्यांगांसाठी कार्य करणार: डॉ संतोष मुंडे (उपाध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र ) जे का रंजले गांजले अशांसाठी डॉ संतोष मुंडे यांचे कार्य आहे: राजेश्वर आबा चव्हाण (जिल्हाध्यक्ष रा. कॉंग्रेस बीड) तहसील अंतर्गत असणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसाठी सहकार्य करू: व्यंकटेश मुंडे (तहसिलदार परळी ) परळी: प्रतिनिधी राज्याची कृषिमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांच्या सहकार्याने परळी येथे दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण,परळीचे तहसीलदार वेंकटेश मुंडे यांच्या उपस्थितीत तब्बल 87 दिव्यांगांना प्रत्येकी, 5 लाख प्रमाणे एकूण 4 कोटी 35 लाख रुपयांच्या कर्जाचे फॉर्म वाटप करण्यात आले. सविस्तर वृत्त: दिनांक 1 मार्च 2024 रोजी, दिव्यां

ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आम्ही सगळे आयोजक - सकल ब्राह्मण समाजाचे पोलिसांना निवेदन

इमेज
  ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आम्ही सगळे आयोजक - सकल ब्राह्मण समाजाचे पोलिसांना निवेदन परळी वैजनाथ, वैजनाथ.......          परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजक  सकल ब्राह्मण समाज परळी वैजनाथ  हे असुन या परिषदेचे स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर आयोजक म्हणून दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा अन्यथा आम्ही सगळे आयोजक आहोत आमच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे परळीतील सकल ब्राह्मण समाजाकडून करण्यात आली आहे.        सकल ब्राह्मण समाजाकडून पोलीसांना आज निवेदन दिले असुन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली.ब्राह्मण ऐक्य परिषदेचे मुख्य आयोजक आम्ही सर्व ब्राह्मण समाज आहोत. कार्यक्रमाचे नियोजन व जबाबदाऱ्या याचा एक भाग म्हणून परळीतील सर्व  ब्राह्मण समाजाने  या परिषदेची  केवळ स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी ही आमच्या समाजाचे नेते बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर दिली होती.त्यामुळे या परिषदेचे आयोजक म्हणून गुन्हा नोंदवून घेत असताना केवळ बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर आपण  गुन्हा दाखल केला आहे हे य

मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक पाचची चिमणी जमीनदोस्त

इमेज
  ■ संपला विषय: परळी वैजनाथ थर्मलचा अखेरचा आवशेषही जमीनदोस्त :शेवटची तिसरी चिमणीही जमीनदोस्त मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक पाचची चिमणी  जमीनदोस्त परळी वैजनाथ, .......       मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या परळी जिल्हा बीड येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संच क्रमांक चारची धूरवाहक चिमणी काल दि.२९ रोजी  जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर आज दि.१ मार्च २०२४ रोजी शिल्लक राहिलेली तिसरी चिमणीही जमीनदोस्त करण्यात आली.परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी अखेरची चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आल्याने परळी वैजनाथ थर्मलचा अखेरचा आवशेषही जमीनदोस्त झाला.         परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी एक चिमणी सप्टेंबर २०२२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आली होती. काल दि.२९ रोजी  सकाळी संच क्रमांक चारची 120 मिटर उंचीची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यानंतर आज दि.१ मार्च २०२४ रोजी दुपारी १ वा. सुमारास शिल्लक राहिलेली संच क्रमांक पाचची २१० मी.उंचीची तिसरी चिमणीही जमीनदोस्त करण्यात आली.    

नगर परिषदेत चोरीचा प्रयत्न: तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल: दोन हाॅल व ११ कपाटांची तोडली कुलूपे

इमेज
  नगर परिषदेत चोरीचा प्रयत्न: तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल: दोन हाॅल व ११ कपाटांची तोडली कुलूपे परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        शहराची मध्यवर्ती संस्था असलेल्या नगर परिषदेत चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्‍यातून समोर आला.या प्रकरणी आता अज्ञात तीन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन हाॅल व ११ कपाटांची  कुलूपे तोडली पण काही चोरीस गेले नसल्याचे नगर परिषद प्रशासनाने फिर्यादीत सांगितले आहे.        परळी वै. नगर परिषदेच्या केंद्र कार्यालयात दि.29/02/2023 रोजी चे पहाटे  03.15 वा. सुमारास यातील अज्ञात तीन अनोळखी इसम हे तोंडाला बांधुन नगर परिषदेच्या केंद्र कार्यालयात दक्षीणेकडील दरवाज्याचे कुलूप तोडुन घुसले. कार्यालया मधील 11 कपाटाचे व दोन हॉलचे कुलूप तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातून व कार्यालयातील कपाटातून काहीही चोरी गेलेले नाही. अशी फिर्याद नगर परिषद कर्मचारी प्रविण प्रभाकर मोगरकर यांनी नोंदवली आहे.यावरुन पोलीस स्टेशन परळी शहर  येथे अनोळखी तीन जणांविरुद्ध गुरनं. 31/2024 कलम 457,380, 511 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक

भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन

इमेज
  दाऊतपूर येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन, आजपासून प्रारंभ  भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील दाऊतपूर येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे शुक्रवार दि.१ मार्च २०२४ ते शनिवार दि.०९ मार्च रोजो आयोजन करण्यात आले आहे. परळी तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.            परळी वैजनाथ तालुक्यातील दाऊतपूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीर्षी अखंड हरिनाम सप्ताहास मानव जीवनात संत संगती शिवाय तरणोपाय मार्ग नाही, संतशिवाय भगवंत नाही ही युक्ती संतानी शिकविली संत संगती घडावी भगवंत प्राप्ती व्हावी म्हणून प्रति वर्षाप्रमाणे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह. भ. प. बाबुराव महाराज बदाले हे करणार आहेत. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम: पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ ग

मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक चारची चिमणी जमीनदोस्त

इमेज
  परळीच्या जुन्या थर्मलची दुसरी चिमणी जमीनदोस्त : २०२२ मध्ये एक चिमणी केली होती जमीनदोस्त मराठवाड्यातील  एकमेव  औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक चारची चिमणी जमीनदोस्त परळी वैजनाथ,  ...       मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या परळी जिल्हा बीड येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संच क्रमांक चारची धूरवाहक चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आली. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी एक चिमणी सप्टेंबर २०२२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आली होती.  आज सकाळी संच क्रमांक चारची  चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. 120 मिटर उंचीची असलेली ही चिमणी आज सकाळी नऊ वाजता जमीनदोस्त करण्यात आली.                 मराठवाड्यातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे सन 1971 मध्ये सुरू झाले.  धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या. सद्यस्थितीला परळी येथे एकूण आठ संच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी संच क्रमांक एक ,दोन, तीन हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संच क्रमांक ती

बिनविरोध निवड:: हार्दिक अभिनंदन

इमेज
  गंगाखेड वकील संघ अध्यक्ष पदी ॲड. विवेक निळेकर यांची बिनविरोध निवड गंगाखेड, प्रतिनिधी.....     गंगाखेड वकील संघ अध्यक्षपदी ॲड. विवेक निळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.          गंगाखेड वकील संघ २०२४-२५ अध्यक्ष पदी अॅड. विवेक निळेकर, उपाध्यक्ष पदी अॅड. सय्यद सादिक, सचिव पदी अॅड. लक्ष्मण केंद्रे, सहसचिव पदी अॅड. सय्यद व कोषाध्यक्ष पदी अॅड. पारवे मॅडम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

भारतातील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि वापराला प्रोत्साहन देणे -डॉ एस आर भुसारी

इमेज
  भारतातील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि वापराला प्रोत्साहन देणे -डॉ एस आर भुसारी      परळी प्रतिनिधी- येथील वैद्यनाथ कॉलेज, रसायनशास्त्र विभाग यांच्यामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्टडी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे साजरा केला. कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय विभाग प्रमुख डॉ. बी.व्ही. केंद्रे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉ. एस. आर. भुसारे  यांनी बी.एससी. व एम. एससी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,  आपण विज्ञानाचे विद्यार्थी असल्याने विविध औषधांची माहिती ठेवून सामाजिक दायित्व योग्य पद्धतीने साधले पाहिजे, जेणेकरून सामाजिक जीवन अधिक सोपे व सुखकर होईल. योग्य औषधी समजावूनच सनदशीर मार्गाने घेणे हेच निरोगी जीवनाचे त्रिकाल बाधित सत्य आहे, कारण काही औषधी समाज जीवनावर अपायकारक ठरण्याची शक्यता असते.योग्य औषधी योग्य आजारावर लवकर नियंत्रण करू शकतात त्याबाबतचे विज्ञान विद्यार्थ्यांनी समजून घेऊन आपली व समाजाची निकोप वाढ करून घेतली पाहिजे.  भारतरत्न सर डॉ.चंद्रशेखर वेंकट रमण यांनी संशोधनाचा पाया

महिला महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या प्रा. वीणा भांगे यांना पिएचडी प्रदान

इमेज
  महिला महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या प्रा. वीणा भांगे यांना पिएचडी प्रदान परळी वैजनाथ ता.२८ (बातमीदार)           शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या संस्कृत विषयाच्या प्राध्यापिका वीणा भांगे यांना संस्कृत विषयात शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पिएचडी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने नुकतीच प्रदान केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.         महिला महाविद्यालयाच्या कनिष्ट विभागातील प्राध्यापिका वीणा गोविंद भांगे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात "महाकवी भासांच्या नाटयसाहित्यातील स्त्रीपात्रांचे विश्लेषणात्मक अध्ययन" या विषयाचा संशोधन प्रबंध डॉ. मीनल श्रीगिरीवार, संशोधन मार्गदर्शक, संस्कृत विभाग, महिला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. विद्यापीठाने तो स्विकारुन वीणा भांगे यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पिएचडी प्रदान केली आहे. पिएचडी प्रदान झाल्याबद्दल संशोधक मार्गदर्शक डॉ. मीनल श्रीगिरीवार व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ वीणा भांगे यांनी आभार मानले आह

कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका

इमेज
  केतकी चितळेंचे वक्तव्य परिषदेतील व्यक्तिगत मतप्रदर्शन:ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या ठरावात याचा कुठेही संबंध नाही ! बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा खुलासा ऐक्य परिषदेत  ब्राह्मण समाजाची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         केतकी चितळेंचे वक्तव्य हे अन्य समाजबांधवांनी मांडलेल्या असंख्य मतप्रदर्शनासारखेच व्यक्तिगत मतप्रदर्शन होते. समाजाच्या व्यासपीठावरून अशी अनेक मत मतांतरे व्यक्त होतात अशाच प्रकारचे हे वक्तव्य होते. ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या सर्वसंमत ठरावात याचा कुठेही संबंध नाही. हे वक्तव्य ठरावाच्या चर्चेत सुद्धा घेतले गेले नाही. ब्राह्मण ऐक्य परिषदेने या वक्तव्याशी सहमती नसल्याचीच भूमिका घेतलेली आहे. हे ऐक्य परिषदेत सर्वसंमत विविध ठरावातून दिसून येईल. त्यामुळे ऐक्य परिषदेत ब्राह्मण समाजाची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका असल्याचा स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी खुलासा केला आहे.         कोणत्याही समाजाचे संमेलन वा परिषद असेल तर त्या व्यासपीठावरुन साधक

बीड जिल्हा कला व क्रीडा मोहत्सव२०२४ चा समारोप समारंभ डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न

इमेज
  बीड जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर  घेवून जाणार - डॉ.संतोष मुंडे बीड जिल्हा कला व क्रीडा मोहत्सव२०२४ चा समारोप समारंभ डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न बीड प्रतिनिधी : दिनांक 28           बीड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बीड येथे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग कला व क्रीडा महोत्सव २०२४ चे बक्षीस वितरण व समारोप समारंभ दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला. या दोन दिवसीय दिव्यांग कला क्रीडा महोत्सव २०२४ चे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संगीता देवी पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव सोळंके यांनी केले .  माननीय जिल्हाधिकारी बीड श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी दिव्यांग क्रीडा स्पर्धेत भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यांनी हिरवी झेंडे दाखवून दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले  बीड जिल्ह्यातील ४० दिव्यांग शाळेतील जवळपास सहाशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. मूकबध

वैद्यनाथ कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती विविध उपक्रमांनी साजरी

इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती विविध उपक्रमांनी साजरी  परळी वैजनाथ,  प्रतिनिधी..... जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये मराठी विभाग अंतर्गत 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून काव्यात्मक अविष्कार या विषयावर प्रथित यश संपादन केलेल्या कवियित्री रचना यांनी व्याख्यान दिले .या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी राठोड, मराठी विभाग प्रमुख डॉ.अर्चना चव्हाण ,डॉ. रामेश्वर चाटे, उपप्राचार्य डॉ. व्ही.बी गायकवाड, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते .या प्रसंगी निसर्ग  व ग्रामीण कविता रचनाऱ्या ना. धो. मनोहर व कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर आधारित शब्दगंध भित्तपत्रकाचे प्रकाशन करण्यात आली. रचना मॅडम यांनी समकालीन कवियित्रीच्या कवितांच्या आधारे स्त्री मनाच्या स्पंदनाचे पटल उलघडले. त्यांच्या काव्यातील सावित्रीबाई श्रोत्यांच्या  मनावर कोरली गेली. कार्यक्रमाची प्रस्ताविक डॉ. रामेश्वर चाटे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिना

पर्यावरण पूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- कृषी मंत्री धनंजय मुंडे

इमेज
पर्यावरण पूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंबई दि 27 फेब्रुवारी 2024- राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या निरंतर विकासाला प्राधान्य देण्यात आले असून पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले असल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.  राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. याविषयी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, कृषी विभागाला 3650 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. वातावरणीय बदलाला सामोरे जाताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बांबू लागवडीचा पर्याय जागतिक दर्जाच्या संशोधनातून पुढे आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली असून त्या अंतर्गत 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 घोषित करून त्यासाठी 7 हजार कोटींच

शिवसेनेच्या वतीने मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण

इमेज
  माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक होते-अभयकुमार ठक्कर शिवसेनेच्या वतीने मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण परळी/प्रतिनिधी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे काल दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनामुळे तमाम शिवसैनिकांत शोककळा पसरली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मनोहर जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मनोहर जोशी म्हणजे शिवसेनेच्या आक्रमक धाटणीत अजातशत्रुत्व असलेले व्यक्तीमत्व असल्याचे म्हटले आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील मनोहर जोशी ज्येष्ठ नेते होते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत मनोहर जोशी सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहे

अतिशय वाचनीय.......

इमेज
  संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला आधुनिक 'चाणक्य' :- डॉ. मनोहर गजानन जोशी !                                                                                            *पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात  सौ. सरस्वती आणि श्री. गजाननराव जोशी या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, 'कमवा आणि शिका' ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौर पदी विराजमान झालेला तसेच पक्षनिष्ठेचा आदर्श ठेवीत नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ते लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचणारा अस्सल मराठमोळा 'चाणक्य' राजकारणी अशी ओळख महाराष्ट्र नव्हे तर देशपातळीवर निर्माण करणारा राजकारणी म्हणजेच डॉ. मनोहर गजानन जोशी !  मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची स्थापना बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ र
इमेज
  आव्हानांचा सामना करण्यासाठी सकारात्मक वृत्ती जोपासावी-  प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे ------------------------------------ बालाजी माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आणि  निरोप समारंभ संपन्न ------------------------------------ परळी प्रतिनिधी:- आव्हानांचा सामना करण्यासाठी सकारात्मकतेची वृत्ती जोपासली पाहिजे असे प्रतिपादन प्रख्यात सिने-नाटय लेखक-दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी केले. ते मराठवाडा बहुउद्देशीय ग्रामीण विकास सेवाभावी संस्था संचलितबालाजी माध्यमिक विद्यालय सेलू येथे व्यवसाय मार्गदर्शन आणि विद्यार्थी निरोप समारंभातबोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, करिअरच्या नवीन वाटा शोधून भविष्यात वाटचाल सुरु करावी.या प्रसंगी संस्था अध्यक्ष वैजनाथ चाटे,गट शिक्षण अधिकारी कार्यालयाचे प्रदीप चाटे ,ज्येष्ठ विधीज्ञ जीवनराव देशमुख,कवी रामकिशन केकान, घोडावत अकॅडमीचे रोहित चोरमारे,आदींनी विद्यार्थ्यांना दहावी नंतरच्या करिअर संधी आणि व्यवसाय मार्गदर्शन संदर्भात प्रबोधन केले.  मुख्याध्यापक नामदेव मुंडे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थीनी कु.पूनम केंद

पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना

इमेज
  मनोहर जोशी यांच्या निधनाने राजकारणातील सुसंस्कृत, संयमी चेहरा हरपला पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना परळी वैजनाथ ।दिनांक २३। माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व संयमी चेहरा हरपला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.  माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मुंडे आणि जोशी कुटुंबियांचे  वैयक्तिक ऋणानुबंध होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक सुसंस्कृत आणि संयमी व्यक्तीमत्व होते. महाराष्ट्र व मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून तळमळ होती. जोशी कुटुंबियांच्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे,सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !! अशा शब्दांत पंकजाताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ••••

सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड ; माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी निवर्तले

इमेज
  सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड ; माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी निवर्तले  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते,माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानं मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान,विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्षसंघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय, संस्मरणीय ठरली. शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांना दिली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उमटवला. दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नि:ष्पक्ष भूमिका त्यांनी बजावली. सामान्य कुटुंबात जन

मला कांहीही नको, फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठिशी असू द्या

इमेज
  मला कांहीही नको, फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठिशी असू द्या पंकजाताई मुंडे यांचं महासांगवीच्या सप्ताहात फुलांच्या वर्षावात अभूतपूर्व स्वागत जिल्हयातील प्रत्येक गडासाठी  निधी दिला ; भविष्यातही आणखी देऊ पाटोदा ।दिनांक २२। श्रीसंत मीराबाई आईसाहेब संस्थान ही माझ्यासाठी हक्काची जागा आहे. माहेर आलेली लेक जसं सर्व काही  हक्काने मागत असते, तसं मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, दुसरं काहीही नको, फक्त  तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठिशी कायम असू द्या. लोकनेते मुंडे साहेबांचा वंचित घटकांच्या सेवेचा वसा घेऊन मी रात्रंदिवस काम करत आहे.एकीची ताकद जगाला दाखवून देण्याची वेळ आली तर एकजूट दाखवा अशा आवाहनवजा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तालुक्यातील महासांगवी येथे श्रीसंत मीराबाई आईसाहेब यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त   आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात आज उपस्थित भाविकांशी संवाद साधतांना पंकजाताई मुंडे बोलत होत्या.  आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे, रामकृष्ण बांगर, मधुकर गर्जे, महेंद्र गर्जे आदी यावेळी उपस्थित होते. मीर

भेसळयुक्त, अप्रमाणित बियाणे विरोधातील कायद्यांच्या संदर्भातील संयुक्त समितीची तिसरी बैठक संपन्न

इमेज
  भेसळयुक्त, अप्रमाणित बियाणे विरोधातील कायद्यांच्या संदर्भातील संयुक्त समितीची तिसरी बैठक संपन्न *मुंबई दि. 21 फेब्रुवारी 2024-* अप्रामाणित, भेसळयुक्त व बनावट बियाणे, कीटकनाशके पासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्याच्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी नियुक्त संयुक्त समितीची तिसरी बैठक आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात पार पडली. या बैठकीस संयुक्त समितीचे सदस्य आ. अमोल मिटकरी, आ. डॉ. मनीषा कायंदे, आ. समीर कुणावर, आ. संजय रायमुलकर आ.कैलास पाटील, आ. बाबासाहेब पाटील, आ.दिलीप बनकर आ.प्रकाश आबिटकर, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनिल गेडाम, विधान भवन सहसचिव मेघना तळेकर व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता. या समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात आला. याद्वारे 2000 अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या असून गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे, त्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निवीष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळज

मौजे परचुंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
मौजे परचुंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी परळी वैजनाथ/प्रतिनिधी तालुक्यातील मौजे परचुंडी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच गुरूलिंगअप्पा नावंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मौजे परचुंडी ग्रामपंचायतीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच गुरुलिंगआप्पा नावंदे, वैजनाथ सरांडे, व्यंकट पाटील गडदे, सचिन अनंत रूपनर, शिवा सरांडे, देवराव पत्रवाळे, राम चाळक, रमेश सरांडे, मुंजा सरांडे, प्रभाकर पडुळे, अजय गडदे, नागेश पत्रवाळे, नितीन नावंदे, बलभीम थोरात यांच्यासह ग्रामस्थ, शिवप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

डॉ.प्रा. सिद्धार्थ तायडे राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

इमेज
  डॉ.प्रा. सिद्धार्थ तायडे राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित  परभणी, प्रतिनिधी:- योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,परभणी यांच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात प्रख्यात सिने-नाटय अभिनेता-लेखक-दिग्दर्शक रंगकर्मी प्रा. डॉ. सिद्धार्थ  तायडे यांना राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित प्रयोगशील शेतकरी कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या हस्ते डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.एखादा महत्त्वपूर्ण पुरस्कार मिळाल्याने पुरस्कार प्राप्तकर्त्याची जबाबदारी वाढत असते. त्यातून अधिक सकारात्मक काम करण्याची ऊर्जा मिळते. ती ऊर्जा पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरते, असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित प्रयोगशील शेतकरी कांतराव काका देशमुख यांनी केले. ते योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,परभणी यांच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा निमित्ताने   बोलत होते.विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच गुलाबराव ताठे  तुकाराम सूर्यवंशी,दीपक

अनोख्या उपक्रमाने केली शिवजयंती साजरी

इमेज
 न्यू एकता पेंटर असोसिएशन च्या वतीने विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप अनोख्या उपक्रमाने केली शिवजयंती साजरी     परळी,(प्रतिनिधी):- न्यू एकता पेंटर असोसिएशन परळीच्या वतीने संत धुराबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या निमित्ताने शालेय साहित्याचे वाटप करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.        यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक जगदीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भगवान साकसमुद्रे, डिजिटल मीडिया परिषदेचे नितीन ढाकणे, विश्वगामी पत्रकार संघाचे दशरथ रोडे, शिक्षक लक्ष्मण वैराळ, न्यु एकता युनियन कमिटिचे अध्यक्ष पिराजी किर्ते, उपाध्यक्ष नूर भाई, सचिव रोडे संतोष, सहसचिव ओमप्रकाश इंगळे, कोषाध्यक्ष गंगाधर वाघमारे, सदस्य संघपाल कसबे, सत्यवान व्हावळे, राजू होके, प्रशांत सोनवणे, शेख इर्शाद, बालाजी देशमुख आधी सह संत धुराबाई विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.