कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका

 केतकी चितळेंचे वक्तव्य परिषदेतील व्यक्तिगत मतप्रदर्शन:ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या ठरावात याचा कुठेही संबंध नाही !


बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा खुलासा


ऐक्य परिषदेत ब्राह्मण समाजाची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
        केतकी चितळेंचे वक्तव्य हे अन्य समाजबांधवांनी मांडलेल्या असंख्य मतप्रदर्शनासारखेच व्यक्तिगत मतप्रदर्शन होते. समाजाच्या व्यासपीठावरून अशी अनेक मत मतांतरे व्यक्त होतात अशाच प्रकारचे हे वक्तव्य होते. ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या सर्वसंमत ठरावात याचा कुठेही संबंध नाही. हे वक्तव्य ठरावाच्या चर्चेत सुद्धा घेतले गेले नाही. ब्राह्मण ऐक्य परिषदेने या वक्तव्याशी सहमती नसल्याचीच भूमिका घेतलेली आहे. हे ऐक्य परिषदेत सर्वसंमत विविध ठरावातून दिसून येईल. त्यामुळे ऐक्य परिषदेत ब्राह्मण समाजाची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका असल्याचा स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी खुलासा केला आहे.


        कोणत्याही समाजाचे संमेलन वा परिषद असेल तर त्या व्यासपीठावरुन साधक बाधक अशा मुद्द्यांवर स्वतःची मते मांडली जाणारच हे नैसर्गिक आहे. परंतु शेवटी सर्वसंमतीने कोणते ठराव मांडले गेले व मंजूर केले यावरुन त्या संमेलन अथवा परिषदेची समग्र भूमिका ठरली जाते. संपूर्ण संमेलनात कोण काय  मत व्यक्त करतो,कोणाची काय व्यक्तीगत मते असतात? ही  केवळ विचामंथनाची प्रक्रिया असते. या संपूर्ण संमेलनात कोणा एकाने मांडलेली भूमिका किंवा मत हे संपूर्ण समाजाची भूमिका असते असे निश्चितच नसते. या परिषदेने संपूर्ण मत मतांतरानंतर  संमत केलेले ठराव ही खऱ्या अर्थाने त्या परिषदेची किंवा संमेलनाची पर्यायाने समाजाची एकमुखी भूमिका असते. परळीत झालेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेत कोणाचाही विरोध करणारा किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या न्याय हक्कांवर गदा येईल असा कोणताही ठराव मंजूर झाला नाही.केवळ ब्राह्मण समाज व त्या समाजाला सातत्याने भेडसावणाऱ्या व भारताच्या नागरिकाला मिळालेल्या घटनादत्त अधिकारांच्या माध्यमातून न्याय मिळवून घेण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका घेण्यात आली. हे सर्व संमत ठरावातून दिसून येते. ही या ऐक्य परिषदेची भूमिका आहे.परंतु कोणाच्या एखाद्याची भूमिका ही सर्व समाजाची भूमिका समजून विनाकारण सकारात्मकतेचे नकारात्मक चित्र तयार करणे हे योग्य ठरणार नाही. केतकी चितळेंचे वक्तव्य हे अन्य समाजबांधवांनी मांडलेल्या असंख्य मतप्रदर्शनासारखेच व्यक्तिगत मतप्रदर्शन होते. ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या सर्वसंमत ठरावात याचा कुठेही संबंध नाही.ऐक्य परिषदेत ब्राह्मण समाजाची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका  असल्याचा खुलासा स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केला आहे.

● ब्राह्मण समाज ऐक्य परिषदेतील ठराव...
 
  1) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आलेले परशुराम आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करुन भरीव आर्थिक निधी द्या..
2) ब्राह्मण समाजाच्या जमिनीवरील अतिक्रमणासाठी व ब्राह्मण समाजातील व्यक्तीचे होणारे सामाजिक विडंबन बाबत विशेष संरक्षण कायदा पास करावा

3) मुलीच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाचे स्वागत.. पण मुलांनाही मोफत शिक्षणाची मागणी व उच्च शिक्षण व व्यावसाईक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळावी

4) ईनामी जमिनी बाबतीत वर्ग 3 व 2 मधून १ मध्ये वर्ग करावेत व मालकी हक्कात नाव घ्यावे

5) ब्राह्मण समाजाच्या कुळ कायद्याचे पुनर्वावलोकन
व्हावे.
6 . विनोबाजी भावे यांच्या भूदान चळवळीत जमिनी दान दिलेल्या ज्या पडीक जमिनी तशाच पडून आहेत त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्यासाठी विशेष कायदा पारित करावा
7. ब्राह्मण पुरोहित वर्गासाठी मानधन योजना सुरू करावी
8. वेद विद्यालयांना अनुदान व कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम ब्राह्मण समाजातील मुलांसाठी मोफत करावेत
9.ब्राह्मण समाजातील महिलांच्या लघुउद्योग व गृह उद्योगासाठी मायक्रो फायनान्स शून्य टक्के दराने कर्ज योजना मंजूर करावी
10.वेद विद्यालयांना अन्य शाळांप्रमाणे शासकीय अनुदान मंजूर करून कर्मचारी भरती करण्यास मंजुरी द्यावी
11. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा.
12. नितीन गडकरी,देवेंद्र फडणवीस यांचा सकल ब्राह्मण समाजाकडून गौरव करण्यात यावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !