इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक चारची चिमणी जमीनदोस्त

 परळीच्या जुन्या थर्मलची दुसरी चिमणी जमीनदोस्त : २०२२ मध्ये एक चिमणी केली होती जमीनदोस्त



मराठवाड्यातील एकमेव  औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक चारची चिमणी जमीनदोस्त
परळी वैजनाथ, 
...

      मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या परळी जिल्हा बीड येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संच क्रमांक चारची धूरवाहक चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आली. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी एक चिमणी सप्टेंबर २०२२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आली होती. आज सकाळी संच क्रमांक चारची  चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. 120 मिटर उंचीची असलेली ही चिमणी आज सकाळी नऊ वाजता जमीनदोस्त करण्यात आली.    

            मराठवाड्यातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे सन 1971 मध्ये सुरू झाले.  धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या. सद्यस्थितीला परळी येथे एकूण आठ संच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी संच क्रमांक एक ,दोन, तीन हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संच क्रमांक तीन, चार व पाच हे संच आयुर्मान संपल्यामुळे निर्णय घेण्यात आलेला आहे. या संचांच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. यामध्ये संच क्रमांक तीन पूर्णतः अवसायनात काढण्याची प्रक्रिया सप्टेंबर २०२२ मध्येच पुर्ण करण्यात आली आहे. आता संच क्रमांक चार मधील  सर्व मशिनरी यंत्रणा व या संचाच्या संबंधित सर्व विभाग हे एक एक करून नाहीसे करण्यात येत आहेत. आज शेवटच्या टप्प्यात संच क्रमांक चार ची धुरवाहक चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक चार 31|21987 मध्ये सुरू करण्यात आला होता. हा संच आता संपूर्णतः बंद करण्यात आलेला आहे.2010 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 4 चे आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅप मध्ये काढला आहे. आयुर्मान संपल्याने 2015 पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता त्यानंतर सन 2019 पूर्वी हा संच स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला यापूर्वी महाजनकोने परळी औष्णिक उद्योग केंद्रातील 30 मेगावॉटचे दोन संच स्क्रॅच मध्ये काढलेले आहेत. विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन, चार  पाच हे तीन संच 2019 पासून बंद आहेत. त्यापैकी संच क्रमांक चार ची 180 मी.  उंचीची चिमणी आज सकाळी पाडण्यात आली आहे.  यावेळी विद्युत केंद्राच्या अधिकारी सुरक्षा विभागाचे कर्मचारी, कन्स्ट्रक्शन विभागाचे कर्मचारी  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट