राज्याचे कृषिमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संतोष मुंडे,राजेश्वर आबा चव्हाण, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या उपस्थित 87 दिव्यांगांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या कर्ज फॉर्म चे वाटप 



शेवटच्या श्वासापर्यंत दिव्यांगांसाठी कार्य करणार: डॉ संतोष मुंडे (उपाध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र )



जे का रंजले गांजले अशांसाठी डॉ संतोष मुंडे यांचे कार्य आहे: राजेश्वर आबा चव्हाण (जिल्हाध्यक्ष रा. कॉंग्रेस बीड)




तहसील अंतर्गत असणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसाठी सहकार्य करू: व्यंकटेश मुंडे (तहसिलदार परळी )


परळी: प्रतिनिधी


राज्याची कृषिमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांच्या सहकार्याने परळी येथे दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण,परळीचे तहसीलदार वेंकटेश मुंडे यांच्या उपस्थितीत तब्बल 87 दिव्यांगांना प्रत्येकी, 5 लाख प्रमाणे एकूण 4 कोटी 35 लाख रुपयांच्या कर्जाचे फॉर्म वाटप करण्यात आले.


सविस्तर वृत्त: दिनांक 1 मार्च 2024 रोजी, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने होत असलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये डॉ संतोष मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले,


दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या या कार्यक्रमास, राजकीय सामाजिक प्रशासकीय विविध मान्यवरांची उपस्थिती होती, प्रथमच एवढ्या मोठ्या व भव्य दिव्य कार्यक्रमाचे औचित्य साधून परळी तालुका आणि परिसरामधील दिव्यांग बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली 


◾️तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की मागील 10 वर्षापासून डॉक्टर संतोष मुंडे यांचे कार्य दिव्यांगासाठी खूप मोठ आहे, दिव्यांग बांधवांसाठी तहसील कार्यालय मार्फत ज्या ही सुविधा असतील त्या योजनेसाठी सहकार्य लागेल ते आमच्या माध्यमातून नक्कीच करू.


◾️कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष,राजेश्वर (आबा) चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ संतोष मुंडे यांच कार्य म्हणजे जे का  रंजले गांजले त्या लोकांसाठी तुम्ही झिजता, तुमचं कार्य खरं म्हणजे संतांच्या कार्याप्रमाणेच आहे असच म्हणावं लागेल, दिव्यांगांच्या चेहऱ्यावर जे समाधान तुमच्या मार्फत पेरल्या जाणार आहे त्या आशीर्वादामुळे तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही असं दिव्यांगाच्या बाबतीत संतोष मुंडे यांचे कार्य आहे असे राजेश्वर आबा चव्हाण म्हणाले .


◾️त्यानंतर ज्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला असे डॉ संतोष मुंडे (उपाध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य) यांनी आपल्या मनोगत पर भाषणामध्ये सांगितले की, राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांसाठी संपूर्ण आयुष्य कार्य करणार, एकही दिव्यांग शासनाच्या योजना पासून वंचित राहणार नाही असा शब्दही त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिला, दिव्यांगासाठी सुरू असलेली शासनाची 1500 रुपयांची मदत 3000 रु प्रति महिना होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असेही डॉ संतोष मुंडे म्हणाले.


यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परळीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके ,परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रुपणर, प्रा.विनोद जगतकर, रामेश्वर महाराज कोकाटे, आदी मान्यवरांची भाषणे झाली.


तदनंतर महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या विद्यमाने 

व उपस्थित सर्व राजकीय सामाजिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते 87 दिव्यांगांना प्रत्येकी 5 लाख रुपयांप्रमाणे एकूण 4 कोटी 35 लाख रुपयांच्या कर्ज फॉर्म चे वाटप मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आले,


यावेळी डॉ संतोष मुंडे ( दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष), कार्यक्रमाचे अध्यक्ष: राजेश्वर आबा चव्हाण (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,बीड), कार्यक्रमास प्रमुख उपस्थित व्यंकटेश मुंडे (तहसीलदार,परळी वैजनाथ),तुळशीराम पवार (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य), वैजनाथ सोळंके (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी वैजनाथ), बाबुराव रुपनर (नायब तहसीलदार परळी वैजनाथ), विजय राठोड (व्यवस्थापक दिव्यांग वित्त व विकासमंत्रालय:बीड), प्रा विनोद जगतकर  रघुनाथ तोंडे (प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष:बीड), रामेश्वर महाराज कोकाटे, ॲड मनजीत सुगरे,सचिन मुंडे (माजी सरपंच नाथ्रा),शेख शमशोद्दीन (मा.नगरसेवक),युवक नेते माधव मुंडे, पद्माकर शिंदे, भरत शिंदे, आदींसह राजकीय, सामजिक,प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 


कार्यक्रम यशस्वीतेसाठी: साजन लोहिया,संतोष आघाव, अनंत बापू मुंडे, सय्यद सुभान, घुगे उद्धव , सुधाकर निश्चळ, दामोदर घनघाव,अमोल गोल्हार, रामचंद्र खोडके,सर्जेराव कुंभार,अंता सोंदळे, मछिद्र किरवले, वसंत होळंबे, पद्मिनी तायडे ,भरत डोंगरे, फिरोज शेख सिकंदर ,सुमन मिसाळ, शेख नसीब ,मच्छिंद्र किरवले ,भरत मुंडे धनराज कराड, राम काकडे, अशोक सोनवणे, दिलीप मकर, रोडे प्रेमलाआदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल साखरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड मनजीत सुगरे यांनी मांडले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !