प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

अनोख्या उपक्रमाने केली शिवजयंती साजरी

 न्यू एकता पेंटर असोसिएशन च्या वतीने विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप





अनोख्या उपक्रमाने केली शिवजयंती साजरी


    परळी,(प्रतिनिधी):- न्यू एकता पेंटर असोसिएशन परळीच्या वतीने संत धुराबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या निमित्ताने शालेय साहित्याचे वाटप करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.


       यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक जगदीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भगवान साकसमुद्रे, डिजिटल मीडिया परिषदेचे नितीन ढाकणे, विश्वगामी पत्रकार संघाचे दशरथ रोडे, शिक्षक लक्ष्मण वैराळ, न्यु एकता युनियन कमिटिचे अध्यक्ष पिराजी किर्ते, उपाध्यक्ष नूर भाई, सचिव रोडे संतोष, सहसचिव ओमप्रकाश इंगळे, कोषाध्यक्ष गंगाधर वाघमारे, सदस्य संघपाल कसबे, सत्यवान व्हावळे, राजू होके, प्रशांत सोनवणे, शेख इर्शाद, बालाजी देशमुख आधी सह संत धुराबाई विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या