शिवसेनेच्या वतीने मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण

 माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक होते-अभयकुमार ठक्कर



शिवसेनेच्या वतीने मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण


परळी/प्रतिनिधी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे काल दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनामुळे तमाम शिवसैनिकांत शोककळा पसरली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मनोहर जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मनोहर जोशी म्हणजे शिवसेनेच्या आक्रमक धाटणीत अजातशत्रुत्व असलेले व्यक्तीमत्व असल्याचे म्हटले आहे.

बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील मनोहर जोशी ज्येष्ठ नेते होते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत मनोहर जोशी सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. 1966 पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले.  मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे अभयकुमार ठक्कर यांनी म्हटले आहे.

यावेळी श्रद्धांजली कार्यक्रमास शिवसेनेचे नेते अभयकुमार ठक्कर, प्रा.अतुल दुबे सर, रमेशअण्णा चौंडे, संजय कुकडे, श्रीनिवास सावजी, मोहन परदेशी, किशन बुंदेले, संजय सोमाणे, योगेश घेवारे, लक्ष्मण मुंडे, मनिष जोशी यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !