मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक पाचची चिमणी जमीनदोस्त

 ■ संपला विषय: परळी वैजनाथ थर्मलचा अखेरचा आवशेषही जमीनदोस्त :शेवटची तिसरी चिमणीही जमीनदोस्त


मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक पाचची चिमणी  जमीनदोस्त


परळी वैजनाथ, .......

      मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या परळी जिल्हा बीड येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संच क्रमांक चारची धूरवाहक चिमणी काल दि.२९ रोजी  जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर आज दि.१ मार्च २०२४ रोजी शिल्लक राहिलेली तिसरी चिमणीही जमीनदोस्त करण्यात आली.परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी अखेरची चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आल्याने परळी वैजनाथ थर्मलचा अखेरचा आवशेषही जमीनदोस्त झाला.

        परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी एक चिमणी सप्टेंबर २०२२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आली होती. काल दि.२९ रोजी  सकाळी संच क्रमांक चारची 120 मिटर उंचीची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यानंतर आज दि.१ मार्च २०२४ रोजी दुपारी १ वा. सुमारास शिल्लक राहिलेली संच क्रमांक पाचची २१० मी.उंचीची तिसरी चिमणीही जमीनदोस्त करण्यात आली.

            मराठवाड्यातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे सन 1971 मध्ये सुरू झाले.  धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या. सद्यस्थितीला परळी येथे एकूण आठ संच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी संच क्रमांक एक ,दोन, तीन हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संच क्रमांक तीन, चार व पाच हे संच आयुर्मान संपल्यामुळे आवसायनात काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संचांच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. यामध्ये संच क्रमांक तीन पूर्णतः अवसायनात काढण्याची प्रक्रिया सप्टेंबर २०२२ मध्येच पुर्ण करण्यात आली आहे.  संच क्रमांक चार मधील  सर्व मशिनरी यंत्रणा व या संचाच्या संबंधित सर्व विभाग हे एक एक करून नाहीसे करण्यात आले. संच क्रमांक चार ची धुरवाहक चिमणी काल दि.२९ रोजी जमीनदोस्त करण्यात आली आहे. 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच  31| 12| 1987 मध्ये सुरू करण्यात आला होता. हा संच आता संपूर्णतः बंद करण्यात आलेला आहे.2010 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 5 चे आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅप मध्ये काढला आहे. आयुर्मान संपल्याने 2015 पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता त्यानंतर सन 2019 पूर्वी हा संच स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला यापूर्वी महाजनकोने परळी औष्णिक उद्योग केंद्रातील 30 मेगावॉटचे दोन संच स्क्रॅच मध्ये काढलेले आहेत. विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन, चार  पाच हे तीन संच 2019 पासून बंद आहेत. त्यापैकी संच क्रमांक पाचची २१० मी.  उंचीची चिमणी आज दुपारी पाडण्यात आली आहे. यावेळी विद्युत केंद्राच्या अधिकारी सुरक्षा विभागाचे कर्मचारी, कन्स्ट्रक्शन विभागाचे कर्मचारी  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार