महिला महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या प्रा. वीणा भांगे यांना पिएचडी प्रदान

 महिला महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या प्रा. वीणा भांगे यांना पिएचडी प्रदान




परळी वैजनाथ ता.२८ (बातमीदार)

          शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या संस्कृत विषयाच्या प्राध्यापिका वीणा भांगे यांना संस्कृत विषयात शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पिएचडी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने नुकतीच प्रदान केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

        महिला महाविद्यालयाच्या कनिष्ट विभागातील प्राध्यापिका वीणा गोविंद भांगे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात "महाकवी भासांच्या नाटयसाहित्यातील स्त्रीपात्रांचे विश्लेषणात्मक अध्ययन" या विषयाचा संशोधन प्रबंध डॉ. मीनल श्रीगिरीवार, संशोधन मार्गदर्शक, संस्कृत विभाग, महिला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. विद्यापीठाने तो स्विकारुन वीणा भांगे यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पिएचडी प्रदान केली आहे. पिएचडी प्रदान झाल्याबद्दल संशोधक मार्गदर्शक डॉ. मीनल श्रीगिरीवार व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ वीणा भांगे यांनी आभार मानले आहेत. तर पिएचडी प्रदान झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, उमेश पारेकर व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ विणा भांगे यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !