भारतातील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि वापराला प्रोत्साहन देणे -डॉ एस आर भुसारी

 भारतातील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि वापराला प्रोत्साहन देणे -डॉ एस आर भुसारी



     परळी प्रतिनिधी- येथील वैद्यनाथ कॉलेज, रसायनशास्त्र विभाग यांच्यामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्टडी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे साजरा केला. कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय विभाग प्रमुख डॉ. बी.व्ही. केंद्रे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉ. एस. आर. भुसारे  यांनी बी.एससी. व एम. एससी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,  आपण विज्ञानाचे विद्यार्थी असल्याने विविध औषधांची माहिती ठेवून सामाजिक दायित्व योग्य पद्धतीने साधले पाहिजे, जेणेकरून सामाजिक जीवन अधिक सोपे व सुखकर होईल. योग्य औषधी समजावूनच सनदशीर मार्गाने घेणे हेच निरोगी जीवनाचे त्रिकाल बाधित सत्य आहे, कारण काही औषधी समाज जीवनावर अपायकारक ठरण्याची शक्यता असते.योग्य औषधी योग्य आजारावर लवकर नियंत्रण करू शकतात त्याबाबतचे विज्ञान विद्यार्थ्यांनी समजून घेऊन आपली व समाजाची निकोप वाढ करून घेतली पाहिजे.  भारतरत्न सर डॉ.चंद्रशेखर वेंकट रमण यांनी संशोधनाचा पाया रचून विज्ञानाची किमयागार म्हणून सुप्रसिद्ध झालेले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड अध्यक्षीय समारोपात म्हणाले की विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी, मानवी कल्याणासाठी, विज्ञान तंत्रज्ञानाची वाढ करण्यासाठी, नवयुकांना संशोधनात संधी उपलब्ध करून देण्यासाठी, समाज प्रबोधनासाठी आजचा राष्ट्रीय विज्ञान दिन महत्त्वाचा ठरत आहे. आत्मनिर्भर भारत विकसित भारत हाच विज्ञानाचा दृष्टिकोन आहे. कार्यक्रमास डॉ. टी.ए.गीत्ते, प्रोफेसर ए.आर. चव्हाण मॅडम, डॉ. बी.के. शेप, डॉ. व्ही . जे. चव्हाण , प्रा. एस.व्ही. रेणुकदास  व अनेक विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक डॉ एम.जी. लांडगे यांनी केले तर आभार विद्यार्थी ज्ञानेश्वर मुंडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार