भेसळयुक्त, अप्रमाणित बियाणे विरोधातील कायद्यांच्या संदर्भातील संयुक्त समितीची तिसरी बैठक संपन्न

 भेसळयुक्त, अप्रमाणित बियाणे विरोधातील कायद्यांच्या संदर्भातील संयुक्त समितीची तिसरी बैठक संपन्न





*मुंबई दि. 21 फेब्रुवारी 2024-*

अप्रामाणित, भेसळयुक्त व बनावट बियाणे, कीटकनाशके पासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्याच्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी नियुक्त संयुक्त समितीची तिसरी बैठक आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात पार पडली.


या बैठकीस संयुक्त समितीचे सदस्य आ. अमोल मिटकरी, आ. डॉ. मनीषा कायंदे, आ. समीर कुणावर, आ. संजय रायमुलकर आ.कैलास पाटील, आ. बाबासाहेब पाटील, आ.दिलीप बनकर आ.प्रकाश आबिटकर, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनिल गेडाम, विधान भवन सहसचिव मेघना तळेकर व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.


या समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात आला. याद्वारे 2000 अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या असून गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे, त्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निवीष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेतली जाईल असा पुनरुच्चार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केला. समितीचे आजपर्यंत झालेले कामकाज विधिमंडळाच्या निदर्शनास आणणार असल्याचे सुद्धा यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.


बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, बियाणे कायदा 1966, कीटकनाशके कायदा 1968 महाराष्ट्र विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 या 4 कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयके सादर केली होती. तसेच अप्रमाणित व भेसळयुक्त निवीष्ठांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण विधेयक 2023 सुद्धा मांडले होते. विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहाने दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी सदरचे विधेयक दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या 25 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्याचा निर्णय  घेतला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !