बीड जिल्हा कला व क्रीडा मोहत्सव२०२४ चा समारोप समारंभ डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न

 बीड जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर  घेवून जाणार - डॉ.संतोष मुंडे



बीड जिल्हा कला व क्रीडा मोहत्सव२०२४ चा समारोप समारंभ डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न


बीड प्रतिनिधी : दिनांक 28


          बीड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बीड येथे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग कला व क्रीडा महोत्सव २०२४ चे बक्षीस वितरण व समारोप समारंभ दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला.


या दोन दिवसीय दिव्यांग कला क्रीडा महोत्सव २०२४ चे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संगीता देवी पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव सोळंके यांनी केले . 


माननीय जिल्हाधिकारी बीड श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी दिव्यांग क्रीडा स्पर्धेत भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यांनी हिरवी झेंडे दाखवून दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले 


बीड जिल्ह्यातील ४० दिव्यांग शाळेतील जवळपास सहाशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. मूकबधिर अस्थिभंग मतिमंद व अंध विद्यार्थ्यांच्या पन्नास मीटर धावणे १०० मीटर धावणे गोळा फेक बेसबॉल थ्रो बॉल क्रिकेट यासारख्या विविध स्पर्धा पार पडल्या. दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री अमृत मंगल कार्यालय बीड येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला दिव्यांग विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर गीत गायन व नृत्य सादरीकरण केले. दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची क्रिकेट स्पर्धा देखील पार पडली.


अशा या जिल्हा स्तरीय दिव्यांग कला क्रीडा स्पर्धां२०२४ चे बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एम. शिंदे , जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना बीड रघुनाथ तोंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

      या समारोप प्रसंगी उपस्थित सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन करताना डॉ संतोष मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर नेणार असे उद्गार काढले .


अतिशय सुंदर नियोजन व उत्कृष्ट क्रीडा स्पर्धा बीड जिल्ह्याच्या जिल्हा स्टेडियमवर पार या सर्व स्पर्धा व सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव पार पाडण्यासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री नखाते ए बी तसेच आलोक कुलकर्णी  सर श्री मदन चव्हाण यांच्या साईनाथ निवासी मतिमंद विद्यालय नाथा पुर यांनी अथक परीश्रम व मेहनत घेतली बीड तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नातून एक अद्वितीय सोहळा बीड जिल्ह्यातील लोकांनी अनुभवला त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



चौकट:

🔶 सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव पार पाडण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री आर एम शिंदे व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री नखाते ए बी तसेच श्री मदन चव्हाण यांच्या साईनाथ निवासी मतिमंद विद्यालय नाथापुर यांनी  घेतले अथक परिश्रम व सूत्र संचालन आलोक कुलकर्णी सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार