भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन

 दाऊतपूर येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन, आजपासून प्रारंभ 


भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील दाऊतपूर येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे शुक्रवार दि.१ मार्च २०२४ ते शनिवार दि.०९ मार्च रोजो आयोजन करण्यात आले आहे. परळी तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

           परळी वैजनाथ तालुक्यातील दाऊतपूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीर्षी अखंड हरिनाम सप्ताहास मानव जीवनात संत संगती शिवाय तरणोपाय मार्ग नाही, संतशिवाय भगवंत नाही ही युक्ती संतानी शिकविली संत संगती घडावी भगवंत प्राप्ती व्हावी म्हणून प्रति वर्षाप्रमाणे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह. भ. प. बाबुराव महाराज बदाले हे करणार आहेत. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम: पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, १ ते २ मोजन, २ ते ४ भावार्थ रामायण, ४ ते ५ प्रवचन, सायं. ५ ते ७ धुपारती, ७ ते ९ भोजन, रात्रौ ९ ते ११ हरिकीर्तन, ११ ते ४  हरी जागर होईल. यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार १मार्च रोजी ह. भ. प. पांडुरंग महाराज गिरी वावीकर, २ मार्च रोजी ह. भ. प. नारायण महाराज पोले,हिंगोली, ३ मार्च रोजी ह. भ. प.संजय नाना महाराज, नाशिक, ४ मार्च रोजी ह. भ. प. मधुकर महाराज सायाळकर, ५ मार्च रोजी ह. भ. प. नामदेव महाराज लबडे, पंढरपूर, ६ मार्च रोजी ह. भ. प.सागर महाराज बोराडे, ७ मार्च रोजी दुपारी २ ते ४ ह. भ. प. विजयानद महाराज सुपेकर, रात्रौ ९ ते ११ ह. भ. प. अशोक महाराज ईलगे, ८ मार्च रोजी ह. भ. प. विनायक महाराज गुट्टे, ९ मार्च रोजी कल्याचे किर्तन १ ते ३ वाजता गुरुवर्य ह. भ. प.अच्युत महाराज यांचे किर्तन व नंतर महाप्रसाद होणार आहे. गायनाचार्य: विदर्भगान कोकिळा

गणेश महाराज जटाळे, कृष्णा महाराज जायभाये, धनंजय महाराज देशमुख, बाळु महाराज कुलकर्णी दस्तापुरकर मृदंगाचार्य श्री लक्ष्मीकांत महाराज बोरकर :  विदर्भगान कोकिळा गणेश महाराज जटाळे अध्यक्ष, श्री संत जगद्‌गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था मालेगाव जि. वाशिम येथील विद्यार्थी नऊ दिवस उपस्थित राहतील.तसेच जागर बेलंबा, वाघबेट, संगम, वडसावित्री भ.मं. परळी, सेलु, लोणी, बोंदरगाव, भगवानबाबा भ.म. शिवाजीनगर, परळी, कासारवाडी, लोकरवाडी, वडगाव वैजवाडी,चिलगरवाडी, सिध्देश्वर भ.मं. दाऊतपुर उपस्थिती राहणार आहेत. या अखंड हरिनाम सप्ताहाचे लाभ घेण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !