प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

डॉ.प्रा. सिद्धार्थ तायडे राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

 डॉ.प्रा. सिद्धार्थ तायडे राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित


 परभणी, प्रतिनिधी:-

योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,परभणी यांच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात प्रख्यात सिने-नाटय अभिनेता-लेखक-दिग्दर्शक रंगकर्मी प्रा. डॉ. सिद्धार्थ  तायडे यांना राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित प्रयोगशील शेतकरी कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या हस्ते डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.एखादा महत्त्वपूर्ण पुरस्कार मिळाल्याने पुरस्कार प्राप्तकर्त्याची जबाबदारी वाढत असते. त्यातून अधिक सकारात्मक काम करण्याची ऊर्जा मिळते. ती ऊर्जा पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरते, असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित प्रयोगशील शेतकरी कांतराव काका देशमुख यांनी केले. ते योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,परभणी यांच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा निमित्ताने   बोलत होते.विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच गुलाबराव ताठे  तुकाराम सूर्यवंशी,दीपक पांडे,प्रा. जगन्नाथ बदाले, गजानन वऱ्हाड, अमोल ढाकणे,विजयकुमार बाबर, माधव जाधव ,डॉ.सोपान घुले विलास साखरे ,संतोष डाके, अशोक भोरकडे ,सौ.अश्विनी देशमुख ,हनुमान जाधव, विठ्ठल जाधव ,गंगाधर मुंडे, रामराज बनसोडे, गणेश हारगुडे,  मुकुंदा गोडांगे, एच. आर. गायकवाड, सौ.रेखा चक्रवार ,कैलास चव्हाण, दीपक चिलगर, प्रवीण खंदारे, प्रकाश हातागळे  यांचा गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अनेक वर्षांपासून समाजातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करीत असते. शिवजन्मोत्सव निमित्ताने संस्था अध्यक्ष प्रा. राजू उदावंत,उपाध्यक्ष प्रा. मदन इदगे,सचिव अश्विनी उदावंत,सौ. रंजना इदगे यांच्या संकल्पनेतून हा कार्यगौरव सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित प्रयोगशील शेतकरी कांतराव काका देशमुख झरीकर तर प्रमुख अतिथी म्हणून गुलाबराव ताठे  तुकाराम सूर्यवंशी,दीपक पांडे,प्रा. जगन्नाथ बदाले, गजानन वऱ्हाड, अमोल ढाकणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मदन इदगे , सूत्रसंचालन डॉ. सिद्धार्थ  तायडे तर आभार प्रदर्शन राजू उदावंत यांनी केले. या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्काराबद्दल स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे ,उपाध्यक्ष डॉ. संभाजी चोथे,सचिव विनायक चोथे,प्राचार्य डॉ. आर. के. परदेशी, उप प्राचार्य प्रा. प्रमोद जायभाये,ग्लोबल आडगावचे लेखक-दिग्दर्शक अनिलकुमार साळवे,निर्माता मनोज कदम,अमृत मराठे,रानबा गायकवाड, दैनिक वास्तवचे संपादक जितेंद्र शिरसाट, दै.पुढारीचे प्रा.रविंद्र जोशी यांनी डॉ. सिद्धार्थ तायडे  यांचे  अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या