आव्हानांचा सामना करण्यासाठी सकारात्मक वृत्ती जोपासावी-  प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे



------------------------------------

बालाजी माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आणि  निरोप समारंभ संपन्न

------------------------------------

परळी प्रतिनिधी:-

आव्हानांचा सामना करण्यासाठी सकारात्मकतेची वृत्ती जोपासली पाहिजे असे प्रतिपादन प्रख्यात सिने-नाटय लेखक-दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी केले. ते मराठवाडा बहुउद्देशीय ग्रामीण विकास सेवाभावी संस्था संचलितबालाजी माध्यमिक विद्यालय सेलू येथे व्यवसाय मार्गदर्शन आणि विद्यार्थी निरोप समारंभातबोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, करिअरच्या नवीन वाटा शोधून भविष्यात वाटचाल सुरु करावी.या प्रसंगी संस्था अध्यक्ष वैजनाथ चाटे,गट शिक्षण अधिकारी कार्यालयाचे प्रदीप चाटे ,ज्येष्ठ विधीज्ञ जीवनराव देशमुख,कवी रामकिशन केकान, घोडावत अकॅडमीचे रोहित चोरमारे,आदींनी विद्यार्थ्यांना दहावी नंतरच्या करिअर संधी आणि व्यवसाय मार्गदर्शन संदर्भात प्रबोधन केले.

 मुख्याध्यापक नामदेव मुंडे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थीनी कु.पूनम केंद्रे हिने सूत्रसंचालन केले.या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी यांचेसह  सहशिक्षक राजेंद्रकुमार डापकर, अमोल मुंडे,पवन घुगे, कांदे, मुसने, कांगणे यांचेसह शिक्षकेतर कर्मचारी गित्ते, काशिनाथ पुने, दहिफळे यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !