प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

नगर परिषदेत चोरीचा प्रयत्न: तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल: दोन हाॅल व ११ कपाटांची तोडली कुलूपे

 नगर परिषदेत चोरीचा प्रयत्न: तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल: दोन हाॅल व ११ कपाटांची तोडली कुलूपे


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
       शहराची मध्यवर्ती संस्था असलेल्या नगर परिषदेत चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्‍यातून समोर आला.या प्रकरणी आता अज्ञात तीन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दोन हाॅल व ११ कपाटांची  कुलूपे तोडली पण काही चोरीस गेले नसल्याचे नगर परिषद प्रशासनाने फिर्यादीत सांगितले आहे.
       परळी वै. नगर परिषदेच्या केंद्र कार्यालयात दि.29/02/2023 रोजी चे पहाटे  03.15 वा. सुमारास यातील अज्ञात तीन अनोळखी इसम हे तोंडाला बांधुन नगर परिषदेच्या केंद्र कार्यालयात दक्षीणेकडील दरवाज्याचे कुलूप तोडुन घुसले. कार्यालया मधील 11 कपाटाचे व दोन हॉलचे कुलूप तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातून व कार्यालयातील कपाटातून काहीही चोरी गेलेले नाही. अशी फिर्याद नगर परिषद कर्मचारी प्रविण प्रभाकर मोगरकर यांनी नोंदवली आहे.यावरुन पोलीस स्टेशन परळी शहर  येथे अनोळखी तीन जणांविरुद्ध गुरनं. 31/2024 कलम 457,380, 511 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोह/ 1137 वळवी हे करत आहेत. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या