आदिवासी समाज विकास मंचच्या बीड जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधरे

 आदिवासी समाज विकास मंचच्या बीड जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधरे



परळी (प्रतिनिधी)

आदीवासी समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या आदिवासी समाज विकास मंच या संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी परळी येथील सामाजीक कार्यकर्ते शंकर गंगाधरे यांची निवड झाली असुन याबाबत संघटनेच्या पदाधिकार्यांनी नियुक्तीपत्र देवुन बीड जिल्ह्यात संघटनेचे काम करण्याच्या सुचना दिल्या.

 आदिवासी समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ स्वामी,उपाध्यक्ष बागेश्वर इंद्रोले,सचिव सौ.उज्वला साबळे,कार्याध्यक्ष रंजनिकांत बंडलू, सचिन आनंदे,सल्लागार किशोर स्वामी,राधेश्याम शडमल्लु,मार्गदर्शक,कन्हैय्यालाल गुरवे,सदस्य नरेश अंटल्ले,सौ. कामिनी कोडगट्टी,गणेश पवार आदींनी बीड जिल्हाध्यक्ष पदाचे शंकर गंगाधरे यांना नियुक्तीपत्र दिले.आदिवासी समाजासाठी केलेले कार्य हे निश्चितच समाजाच्या कामी आलेले आहे.भविष्यातही सामाजिक कार्याचा वसा व वारसा घेऊन आपण आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टिने सामाजिक कार्य करणार आहात. आतापर्यंत आदिवासी जमातीसाठी केलेले उल्लेखनीय कार्य पाहून व  बिस्सामुंडा,विर एलव्य,राघोजी भांगरे,तंट्या भिल व उमा नाईक, नरसिम्हा रेड्डी या आदिवासी क्रांतीकाऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व आदिवासी समाज विकास मंचचे मराठवाडा अध्यक्ष सतिषजी नाटेकर यांच्या कुशल नेतृत्व, मार्गदर्शक व आदेशान्वये आपली बीड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असुन आदिवासी समाज विकास मंचच्या माध्यमातून आदिवासी जमातीचा सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक व राजकीय असा सर्वागिण विकास करण्यासाठी व आदिवासी समाज विकास मंचचे कार्य तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर मजबुत करण्यासाठी आपल्या पदाचा जास्तीत जास्त वापर करावा असे या नियुक्तीपत्रात नमुद करण्यात आले आहे.यावेळी परळी येथील धनंजय गोतावळे,वैभव राडकर,मधुकर धुमाळ,गजानन मन्नाळे,अंगद गंगाधरे,गजानन गंगाधरे,महेश बळवंत आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार