परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

वैद्यनाथ कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती विविध उपक्रमांनी साजरी

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती विविध उपक्रमांनी साजरी




 परळी वैजनाथ,  प्रतिनिधी..... जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये मराठी विभाग अंतर्गत 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून काव्यात्मक अविष्कार या विषयावर प्रथित यश संपादन केलेल्या कवियित्री रचना यांनी व्याख्यान दिले .या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी राठोड, मराठी विभाग प्रमुख डॉ.अर्चना चव्हाण ,डॉ. रामेश्वर चाटे, उपप्राचार्य डॉ. व्ही.बी गायकवाड, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते .या प्रसंगी निसर्ग  व ग्रामीण कविता रचनाऱ्या ना. धो. मनोहर व कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर आधारित शब्दगंध भित्तपत्रकाचे प्रकाशन करण्यात आली. रचना मॅडम यांनी समकालीन कवियित्रीच्या कवितांच्या आधारे स्त्री मनाच्या स्पंदनाचे पटल उलघडले. त्यांच्या काव्यातील सावित्रीबाई श्रोत्यांच्या  मनावर कोरली गेली. कार्यक्रमाची प्रस्ताविक डॉ. रामेश्वर चाटे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद करून समाज माध्यमावर मराठी भाषेचा उपयोग करताना मिळवणाऱ्या रोजंदारीची संधी या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर डी राठोड यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या साहित्याची वाचनाची गोडी लावावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगितले व रचना मॅडम यांनी घेतलेला काव्यातील स्त्रीच्या भावनाचा आविष्कार श्रोत्यांना मंत्रमुक्त करणार आहे असे सांगितले. मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी कु. सारिका मुंडे या विद्यार्थिनी  विशेष रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतली. मराठी विभाग प्रमुख डॉ.अर्चना चव्हाण यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले .त्याचबरोबर 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त वैद्यनाथ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे अभिवाचन व काव्यवाचन करून कुसुमाग्रज यांनी कुसुमाग्रजच्या अभिवादन केले.  कॉलेजमधील इतिहास विभाग डॉ.बी.के.शेप यांनी मराठी विभागास आशा बगे यांची भूमी ही कादंबरी भेट दिली .मराठी साहित्य संपदा वृध्दीगत व्हावी व वाचन संस्कृतीचे जतन करावे हा संदेश देऊन मराठी भाषेची अस्मिता जपावी असे विद्यार्थ्यांना सांगितले. प्राचार्य डॉ.आर डी राठोड प्राचार्य भाषा विभाग प्रमुखांनी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून डॉ. चव्हाण यांनी मराठी विभाग अंतर्गत मराठी भाषा दिन उत्साहात साजरा केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!