पोस्ट्स

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा आगळा- वेगळा संकल्प* *आता शोकाकुल कुटुंबियांनाही देणार मायेचे दोन घास !*

इमेज
 * गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा आगळा- वेगळा संकल्प* *आता शोकाकुल कुटुंबियांनाही देणार मायेचे दोन घास !*  परळी । दिनांक ०५।  एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या घरात चूल पेटवली जात नाही, अशा कुटुंबियांसाठी त्यांच्या परवानगीने  तीन दिवस भोजनाची व्यवस्था करण्याचा निर्णय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने घेतला आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या या आगळया-वेगळया संकल्पाने त्यांची प्रत्येकांशी असलेली कौटुंबिक नाळ अधिक दृढ होणार आहे.  समाजातील प्रत्येकांना कधी ना कधी दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागते. एखाद्या कुटुंबात कुणी मयत झाला तर त्याच्याकडे किमान तीन दिवस चूल पेटत नाही, अशा परिस्थितीत नातेवाईक जवळपास असतील ठिक पण अनेकांकडे  जेवणाची सोय होऊ शकत नाही. यासाठी पंकजाताई मुंडे यांनी प्रत्येकांची नातेवाईक होण्याचे ठरवले आहे. कुणाच्या घरी मृत्यू अथवा दुःखद प्रसंग घडला तर त्यांचेशी संपर्क साधून त्यांच्या परवानगीने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत तीन दिवस भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला आले आहे अशा कुटुंबाचे अभिनंदन करून त्यांना मिठ

MB NEWS-बीड जिल्हयाला 56 हजार 500 लसी उपलब्ध तर जिल्ह्याचा ऑक्सिजनही लेव्हलला* *धनंजय मुंडेंच्या प्रशासकीय बैठका व शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा*

इमेज
 * बीड जिल्हयाला 56 हजार 500 लसी उपलब्ध तर जिल्ह्याचा ऑक्सिजनही लेव्हलला*  *धनंजय मुंडेंच्या प्रशासकीय बैठका व शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा*  बीड (दि. 05) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणणे तसेच बाधित रुग्णांना उपचार मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सातत्याने बैठकांचे सत्र घेऊन त्यांना आवश्यक बाबींचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याचे फलित जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने जिल्ह्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा आता नियमित होऊ लागला आहे. तसेच काल जिल्ह्याला कोव्हीशिल्ड लसीचे 44500 आणि कॉव्हॅक्सिन लसीचे 12000 असे एकूण 56 हजार 500 डोस प्राप्त झाले आहेत.  18 वर्षांवरील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करून लस देणे तसेच पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना विहित वेळेत दुसरा डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.  बीड जिल्ह्यात 04 मे रोजी कोव्हीशिल्ड चे 44500 तर कोव्हॅक्सिनचे 12000 डोस प्राप्त झाले. कोव्हॅक्सिनचे सर्व डोस प्रथम लसीकरण होत असलेल्या 18 वर्षे वरील वयाच्या व्यक्तींना वापरण्यात

MB NEWS-मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करणारा* *निकालानंतर पंकजाताई मुंडे यांचं ट्विट*

इमेज
 * मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करणारा* *निकालानंतर पंकजाताई मुंडे यांचं ट्विट* मुंबई । दिनांक ०५।  मराठा समाजाच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल अंतर्मुख करणारा आहे. समाजातील तरूणांईसमोर आता भविष्यात प्रश्नचिन्ह आहे. आमचा प्रमाणिक 'नायक' कोण ? आरक्षणाचा खरा 'टक्का' कोण सांगेल आणि देईल ? असा सवाल माझे मराठा समाज बांधव विचारत आहेत असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवगातंर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निकाल आज दिला. यावर पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करतो, निकाल असा लागणारच नाही असं खरंच कोणाला वाटलं होतं का ? मराठा समाजाचा संघर्ष मोर्चा, बैठका,आरोप -प्रत्यारोप आणि राजकारण याखाली दबून गेला आहे. झालं तर मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी आहे. समाजाला अवास्तव शब्द दिले आणि समाजाची प्रतारणा झाली अशी भावना आहे. आता भविष्यात तरुणाई समोर प्रश्न

MB NEWS-मोठी बातमी! मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

इमेज
  मोठी बातमी! मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द नवी दिल्ली :  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारनं बनविलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवला आहे.  मराठा समाजाला आरक्षित प्रवर्गात आणण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समुदाय म्हणून घोषित करता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.  गायकवाड आयोग ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यासाठी अपवादात्मक स्थिती स्पष्ट करू शकला नाही, असेही मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे. मराठा आरक्षण रद्द करतोय, असे स्पष्ट मत कोर्टाने दिले आहे. अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी कोर्टाच्या निकालानंतर दिली आहे.  कोर्टाचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे. कोर्टाच्या या दुर्दैवी निर्णयामुळे स्थगित असलेले आरक्षण थांबलेले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.  देशभर बहुचर्चित मराठा आरक्षण खटल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या ५ न्यायमूर्तींचे घटनापीठाने आज बुधवारी दिला. मार्च महिनाअखेरीस झालेल्या मॅरेथॉन सु

MB NEWS-पुरोहिताला थोबाडीत मारणं पडलं महागात, जिल्हाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं !

इमेज
  पुरोहिताला थोबाडीत मारणं पडलं महागात, जिल्हाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं ! त्रिपुरा | त्रिपुरातील आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी लग्नात घुसून वऱ्हाडींवर कारवाई केली होती. मात्र कारवाई दरम्यान वऱ्हाडींशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.धार्मिक विधी करणार्या पुरोहिताला थोबाडीत मारलं होतं.ब्राह्मणाला मारणं जिल्हाधिकारी यांना महागात पडलं असुन या जिल्हाधिकाऱ्याला सध्या पदावरुन हटवलं गेलं आहे.गैरवर्तन करणारे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांचं निलंबन करून त्यांना पदावरुन हटवण्यात आलंय.      पश्चिम त्रिपुरातील लग्न समारंभात जाऊन आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी वधू-वरासह पाहुण्यांनाही हुसकावून लावलं होतं. तसेचधार्मिक विधी करणार्या पुरोहिताला थोबाडीत मारलं होतं. या घटनेचा व्हिडीओ झाल्यानंतर काही जणांनी त्यांच्या दबंग कारवाईचं कौतुक केलं होतं, मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. शैलेश यादव यांनी माफीही मागितली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. परंतु अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

MB NEWS-*लोकांचे जीव वाचविण्यात मानवी चुका आढळल्या तर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा - धनंजय मुंडेंची स्वाराती, सार्वजनिक बांधकाम व महावितरणच्या अधिकाऱ्यांना तंबी*

इमेज
 *अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयास धनंजय मुंडेंची अचानक भेट, 50 ऑक्सिजन बेड वाढविण्याचे निर्देश, विविध सुविधांचा घेतला आढावा* *ऑक्सिजन प्लांट सह रुग्णालयातील वीज पुरवठ्यासाठी पर्यायी विद्युत पुरवठा तातडीने उभा करा; यात हलगर्जीपणा झालेला चालणार नाही - ना. मुंडे* *लोकांचे जीव वाचविण्यात मानवी चुका आढळल्या तर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा - धनंजय मुंडेंची स्वाराती, सार्वजनिक बांधकाम व महावितरणच्या अधिकाऱ्यांना तंबी* अंबाजोगाई (दि. 03) ---- : रविवारी रात्री बीड जिल्हाधिकारी अचानक भेट दिल्यानंतर आज (सोमवार) दुपारी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे आज अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून त्यांनी दाखल असलेली एकूण रुग्णसंख्या, उपलब्ध व शिल्लक बेड, रेमडीसीविर इंजेक्शनची वितरण प्रक्रिया, ऑक्सिजन पुरवठा या सर्वच बाबींचा बारकाईने आढावा घेतला.  स्वाराती रुग्णालयात एकूण ऑक्सिजन बेडची संख्या व उपलब्ध संसाधने पाहता आणखी 50 बेड वाढविणे शक्य आहे, ते बेड तातडीने तयार करून रुग्णांसाठी खुले करावेत असे निर्देश यावेळी

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या 'सेवा यज्ञा'ला प्रारंभ* *पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते आयसोलेशन सेंटरचे ऑनलाईन उदघाटन* *स्वतःची तब्येत ठिक नसतानाही मुंडे भगिंनींचे रूग्णांसाठी सेवा कार्य !*

इमेज
 * गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या 'सेवा यज्ञा'ला प्रारंभ*  *पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते आयसोलेशन सेंटरचे ऑनलाईन उदघाटन*  *स्वतःची तब्येत ठिक नसतानाही मुंडे भगिंनींचे रूग्णांसाठी सेवा कार्य !* परळी । दिनांक ०३।  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोविड रूग्णांसाठी शहरात सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटर व घरपोंच मोफत भोजन व्यवस्थेचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने करण्यात आला. या सेंटरमध्ये आजपासून रूग्णसेवेला प्रारंभ झाला आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने अक्षता मंगल कार्यालयात शंभर बेड क्षमतेचे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. १ मे पासून यासाठी नोंदणी सुरू झाली होती. गेल्या दोन दिवसांत नोंदणी झालेले सुमारे २५ हून अधिक लक्षणे नसलेले कोरोना बाधित रूग्ण सेंटरमध्ये भरती झाले असून तज्ज्ञ डाॅक्टरांच्या देखरेखीत मोफत औषधोपचार, भोजनासह त्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. कोरोना बाधित

MB NEWS-.....अन्यथा राज्यात मुंडन आंदोलन करणार -सुरेंद्र कावरे

इमेज
  .....अन्यथा राज्यात मुंडन आंदोलन करणार -सुरेंद्र कावरे परळी वैजनाथ,प्रतिनिधी... लोकांनी अन्नधान्य दिल्यानंतर ज्यांची उपजीविका भागते अश्या गावगाढा चालवणार्‍या बलुतेदारांना राज्य सरकारने मदत जाहीर केली नाही. जर बारा बलुतेदारांवर अन्याय होत असेल तर राज्यात लवकरच नाभिक समाज राज्य सरकारच्या निषेधार्ध मुंडन आंदोलन करून आपल्या बंद दुकानावर जाहीर निषेधाचे फलक लावणार आहे. असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे युवक प्रदेशअध्यक्ष सुरेंद्र कावरे यांनी दिला आहे.  नाभिक समाजाच्या २९ आत्महत्या झाल्या एका ही लोकप्रतिनिधीने साधी चौकशी ही केली नाही किंवा कसलीही मदत पण केली नाही राज्य सरकारने या २९ कुटुबिंयाना १० लाखाची आर्थिक मदत लवकर जाहीर करावी घरातील कर्ता मानुस गेल्यामुळे कुटुंब उघडयावर पडले आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सुुतार,लोहार,कुभांर,धोबी यांच्या सारख्या अनेक छोटया छोटया अनेक व्यवसायीकांवर कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे अनेक जन व्यवसायिक शहर सोडुन गावाकडे तर कोणी शेताकडे जाऊन राहिले आहेत हे लॉकडॉउन किती दिवस चालणार आहे हे कोणी सुध्दा सांगु शकत नाही गेली दोन महिने झालेदुकानदारी

MB NEWS-दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी; गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना होतोय त्रास

इमेज
  दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी; गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना होतोय त्रास  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...... कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या प्रचंड गर्दीचा वयोवृद्ध लोकांना त्रास होताना दिसून येत आहे. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता दुसऱ्या डोस साठी आलेल्या नागरिकांची स्वतंत्रपणे व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरा डोस घेणारे नागरिक हे वयोवृद्ध असून त्याचा त्रास दूर करावा अशी मागणी होत आहे.       गेल्या एक तारखेपासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात येत आहे. परंतु ही लस घेण्यासाठी तोबा गर्दी होताना दिसत आहे. यामध्ये दुसरा डोस घेण्यासाठीही नागरिक गर्दी करत असून दुसरा डोस घेणाऱ्यांची वयोमर्यादा ही पंचेचाळीस च्या पुढची आहे. वयोवृद्ध नागरिक ह्यात भाऊ पाऊस असल्याने गर्दीमुळे ताटकळत बसण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रावर या नागरिकांना घटून घंटे बसावे लागत आहे. सोशल डिस्टंसिंग गर्दीचा त्रास यामुळे जीव गुदमरून जात आहे .यासाठी दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था प्रत्ये

MB NEWS-जोशी कुटुंबियांचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

इमेज
  जोशी कुटुंबियांचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन परळी (दि. 30) : परळी शहरातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार भास्करराव जोशी यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले होते, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज भास्करराव जोशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी व ना. मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्यासह जोशी कुटुंबातील सदस्यांचे ना. मुंडे यांनी सांत्वन केले  जुन्या पिढीतील अत्यंत अभ्यासू पत्रकार म्हणून भास्करराव जोशींची ओळख होती, पुणे येथे दै. तरुण भारत या वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. तद्नंतर परळी येतील साप्ताहिक जगमित्र चे ते संस्थापकीय संपादक होते. अलीकडच्या काळात अनेक पत्रकार-लेखकांना ते मार्गदर्शन करत.  भास्करराव जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रशांत हे ना. धनंजय मुंडे यांचे तब्बल 20 वर्षांहून अधिक काळापासून स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यामुळे साहजिकच जोशी कुटुंबियांशी ना मुंडे यांचा दीर्घकाळापासून स्नेह आहे.  स्व. भास्करराव जोशी हे जुन्या पिढीतील एक ज्येष्ठ पत्रकारच नव्हे ते आमचे म

MB NEWS-महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करू - धनंजय मुंडे* *महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा*

इमेज
 * महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करू - धनंजय मुंडे* *महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा* बीड (दि. 30) ---- : महाराष्ट्र राज्य सरकारने व्यापक कोविड लसीकरण मोहीम हाती घेतली असून वय वर्ष 18 ते 44 मधील सर्व नागरिकांना आता मोफत लस देण्यात येणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या व्यापक लसीकरण मोहिमेस पाठबळ देण्यासह महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करू असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ना. मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. वातावरणात वाढती उन्हाची दाहकता आणि त्यात रोज वाढणारी संसर्गाची आकडेवारी एकीकडे चिंताजनक रूप धारण करत आहेत, त्यात आरोग्य विभागासह सर्व प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कष्ट घेऊन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  जिल्हा वासीयांनी या प्रयत्नांना यश यावेत यासाठी आपली जबाबदारी ओळखून यंत्रणांना सहकार्य करणे आता अनिवार्य आहे. सर्वव्यापी लसीकरण मोहिमेत पात्र असणाऱ्या प्

MB NEWS-लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन, कोरोनावरील उपचारादरम्यान हृदयविकाराचा धक्का

इमेज
  लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन, कोरोनावरील उपचारादरम्यान हृदयविकाराचा धक्का नवी दिल्ली : लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना  यांचं निधन झालं आहे. रोहित सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय अँकर होते. रोहित यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी तसंच झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करुन ही धक्कादायक माहिती दिली. रोहित सरदाना हे झी न्यूजमधून आज तकमध्ये आले होते. मितभाषी आणि संयमी न्यूज अँकर म्हणून ते परिचीत होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सुधीर चौधरी हे ट्विटमध्ये म्हणतात, “आताच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र शर्मांचा फोन आला. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून हात थरथर कापू लागले. माझा मित्र आणि सहकारी रोहित सरदानाच्या मृत्यूची ती बातमी होती. हा व्हायरस आमच्या इतक्या जवळच्या कोणाला घेऊन जाईल याची अजिबात कल्पना नव्हती. हा देवाचा अन्याय आहे, ओम श

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सेवा यज्ञ ; आयसोलेशन सेंटरच्या रूग्णांसाठी उद्यापासून नांव नोंदणी* *कोरोना बाधित महिला रूग्णांच्या परिवाराला घरपोच भोजनाचीही होणार व्यवस्था*

इमेज
 * गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सेवा यज्ञ ; आयसोलेशन सेंटरच्या रूग्णांसाठी उद्यापासून नांव नोंदणी*  *कोरोना बाधित महिला रूग्णांच्या परिवाराला घरपोच भोजनाचीही होणार व्यवस्था* परळी । दिनांक ३०। कोरोना संक्रमित रूग्णांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने 'सेवा यज्ञ ' सुरू करण्यात येत आहे. प्रतिष्ठानच्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरसाठी रूग्णांच्या नांव नोंदणीला उद्या १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरवात होणार असून ३ मे पासून सेंटर मध्ये रूग्ण सेवेला सुरवात होणार आहे.    सध्या सर्वत्र कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून परळी व परिसरात रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा संकट काळात कोरोना रूग्ण व त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून रूग्णांना आयसोलेशन सेंटर व घरपोंच भोजनाची व्यवस्था केली आहे. *सुसज्ज आयसोलेशन सेंटर*  ------------------------------- शहराच्या शिवाजी चौकातील अक्षता मंगल कार्यालयात सर्व सोय

MB NEWS-दुःखद वार्ता: पत्रकार अनुप कुसुमकर यांना पत्नीशोक

इमेज
दुःखद वार्ता: पत्रकार अनुप कुसुमकर यांना पत्नीशोक परळी l प्रतिनिधी मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे पत्रकार अनुप कुसुमकर यांच्या पत्नी अश्विनी कुसुमकर यांचे आज शुक्रवार दि.30 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 32 वर्षांच्या होत्या. पत्रकार अनुप कुसुमकर यांच्या पत्नी अश्विनी कुसुमकर यांना आज पहाटेच्या सुमारास झोपेत असतांनाच हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अश्विनी यांच्या पश्चात पती, मुलगा, सासूबाई, दिर,जाऊ असा मोठा परिवार आहे. कुसुमकर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात MB NEWS परिवार सहभागी आहे.

MB NEWS-कोरोना निवारणावर आर्य सभेतर्फे वेब व्याख्यानमाला ‌ डॉ. लहाने यांच्यासह नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार ‌

इमेज
  कोरोना निवारणावर आर्य सभेतर्फे वेब व्याख्यानमाला  ‌  डॉ. लहाने यांच्यासह नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार ‌ . ‌ ‌परळी वैजनाथ (दि.२९)-------- ‌ सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या आजारावर मात करता यावी, यादृष्टीने नागरिकांचे प्रबोधन व्हावे व त्यांना जगण्याचे नवे बळ मिळावे, या उद्देशाने प्रांतीय आर्य प्रतिनिधी सभेतर्फे व्यापक स्तरावर वेब व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना जनजागृती अभियानांतर्गत दि.१ ते ७ मे २०२१ दरम्यान मोबाईलच्या झूम मीटवरुन दररोज सायंकाळी ६.०० वाजता योग, निसर्गोपचार, आयुर्वेद, होमिओपॅथी ,अलोपॅथी ,अध्यात्म , अग्निहोत्र आदी विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्याने संपन्न होतील. यात नामवंत शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल लहाने (लातूर), प्रसिद्ध होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील (लंडन), योगप्रशिक्षक प्रा. डी.एम. शेप (जिंतूर), निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. धनलाल शेंद्रे (नागपूर), यज्ञविशेषज्ञ डॉ. कमलनारायण आचार्य(रायपुर), वैदिक विद्वान पं. राजवीर शास्त

MB NEWS-कोविड19 अपडेट* गुरुवार दि 29 एप्रिल 21

इमेज
 * कोविड19 अपडेट* गुरुवार दि 29 एप्रिल 21 अंबाजोगाई 215,  आष्टी 133,  बीड 320,  धारूर 84,  गेवराई 200,  केज 131 ,  माजलगाव 52,  परळी 119,  पाटोदा 75,  शिरूर 85,  वडवणी 56,  असे एकूण बीड जिल्ह्यात रुग्ण 1470 चाचणी 4902 निगेटिव्ह 3432 रुग्णवाढ दर 29.98% परळी शहर 63 परळी ग्रामीण 56

MB NEWS-नागापुर येथे आरोग्य विभागातील कोविड यौद्ध्यांचा सत्कार; श्रीकांत जोशी यांच्यावतीने पी पी ई किट (ड्रेस) 5 हॅण्डग्लोज 200 साॅनिटायझर, डेटाॅल साबन व मास्क वाटप

इमेज
  नागापुर येथे आरोग्य विभागातील कोविड यौद्ध्यांचा सत्कार; श्रीकांत जोशी यांच्यावतीने पी पी ई  किट (ड्रेस) 5 हॅण्डग्लोज 200 साॅनिटायझर, डेटाॅल साबन व मास्क  वाटप नागापुर, प्रतिनिधी....... श्रीकांत दासराव जोशी यांच्या तर्फे नागापुर प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये पि पि आर किट (ड्रेस) 5 हाण्डग्लोज नग 200 साॅनिटायझर डेटाॅल साबन व मास्क यांचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी नागापुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टर कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा वर्कर या सर्वानी मागील एक वर्षभर केलेल्या कामाबदल सत्कार करण्यात आला. या कार्यकर्मास दैनिक न्याय टाईम्सचे मुख्य संपादक बाळकिसन सोनी संजय गुंडाळे श्रीकांत दासराव जोशी शंशिकात जोशी विलास मालपांडे सस्कांर जोशी कैलास सोळंके मनोज कळस्कर मोहन सोळंके सतीष सोळंके प्रदीप बनसोडे अमोल बनसोडे नामदेव बनसोडे ऊपस्थित होते.यावेळी डाॅ शुभांगी मुंडे (CHO) बि एस चाटे (आरोग्य सहाय्यक ) सिध्दार्थ जगतकर (मुख्य औषध निर्माण अधिकारी) नयना जोगदंड प्रेमकुमार सरवदे कोंकलवाड सुप्रिया रायभोये(सेवक) अतुल लोखंडे(सेवक) नागनाथ सोळंके(सेवक) पाडुंरग सोळंके(सेवक ) या सर्व न

MB NEWS- *दुःखद वार्ता: नरसिंग देशमुख यांना मातृशोक;प्रमिलाबाई देशमुख यांचे निधन*

इमेज
 *दुःखद वार्ता: नरसिंग देशमुख यांना मातृशोक; प्रमिलाबाई देशमुख यांचे निधन*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      येथील सर्व परिचित प्रमिलाबाई गणपतराव देशमुख यांचे वार्धक्य व अल्पशा: आजाराने निधन झाले. नरसिंग देशमुख यांच्या त्या मातोश्री होत.      त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा,सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबावर कोसळलेल्या या दु: खात एम बी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-सरकारने राज्यातील सर्व खाजगी रुग्णालये कोरोनासाठी अधिग्रहित करावीत - रानबा गायकवाड

इमेज
  सरकारने राज्यातील सर्व खाजगी रुग्णालये कोरोनासाठी अधिग्रहित करावीत  - रानबा गायकवाड  परळी  (प्रतिनिधी  )  दुष्काळी परिस्थितीत जेंव्हा भीषण पाणीटंचाई निर्माण होते तेंव्हा राज्य सरकार गाव  जिल्हा पातळीवरील सर्व विहीर अधिग्रहित करून जनतेला पिण्याचे पाणी पुरवठा करते. त्याच धर्तीवर सध्याची कोरोनाची भयाण परिस्थिती लक्षात घेऊन व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील सर्व खाजगी रुग्णालये किमान एक महिना अधिग्रहित करण्याची मागणी जेष्ठ पञकार व  साहित्यिक रानबा गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.     याबाबत दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात जाणवत आहे. रुगणसंख्या वाढत असल्याने सरकारी. महानगरपालिका,  नगरपालिका यांच्या दवाखाने आणि कोविड सेंटरवर अतिरिक्त ताण आला आहे. शासकीय रुग्णालयात योग्य आणि कमी खर्चात रुग्णावर उपचार होत आहेत.       कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी,  जनतेला योग्य शासकीय दरातच उपचार मिळावेत. बेडचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच रेमेडिसिवरचा काळाबाजार रोखण्या

MB NEWS- *दिलासादायक:ज्योतीषशास्त्राच्या कांगोऱ्यातून कोरोनाचे विश्लेषण*

इमेज
 *दिलासादायक:ज्योतीषशास्त्राच्या कांगोऱ्यातून कोरोनाचे विश्लेषण* --------------------------------- _10 मे 2021 पासून स्थिती नियंत्रणात येणे सुरू होईल तर 22 मे 2021 नंतर परिस्थितीमध्ये जलद गतीने सुधारणा_ -------------------------------- मानवाची कितीही प्रगती झाली तरी मनातील चिंता, अस्थिरता, नैराश्य काही केल्या कमी होत नाहीत. ती दूर करून आत्मसुखाचा मंगल वर्षाव व्हावा या हेतूने सदर ज्योतिषीय विश्लेषण करण्यात येत आहे. गुरु हा सूर्यमालेतील पाचवा ग्रह. अत्यंत शक्तिशाली बृहस्पती, जे समस्त देवांचे गुरु असून विश्वातील चित्तशक्तीचे कारक व तेजोरुपी आनंद आहेत म्हणूनच गुरु हा सच्चिदानंद आहे. सच्चिदानंदाचे अधिष्ठान असल्याखेरीज संसारात शांतता, समाधान व सौख्य मिळणार नाही त्यामुळे प्रत्येक कार्यात गुरूचे सहाय्य घ्यावेच लागते. ज्यावेळी त्यांच्या विशाल गर्जनेने संपूर्ण विश्व हादरून जाते, त्या गुरूचे साहाय्य असल्याशिवाय शांतता समाधान मिळूच शकत नाही. परंतु ज्यावेळी हा गुरु ग्रह नक्षत्र राशी ने दूषित होतो, त्यावेळी पृथ्वीतलावर हाहाकार माजतो. त्याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक व भयावह असतात. पण या गुरुची स्थिती

MB NEWS-ना.धनंजय मुंडे पाठोपाठ भाऊ अजय मुंडेंनीही दिला पंकजाताईंना धीर

इमेज
ना.धनंजय मुंडे पाठोपाठ भाऊ अजय मुंडेंनीही दिला पंकजाताईंना धीर परळी वैजनाथ, प्रतिनिधी: भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर पंकजा मुंडेंना अनेक कार्यकर्त्यांचे आणि चाहत्यांचे काळजी घ्यावी अशा कमेंट आल्या. यामध्ये भावनिक प्रतिक्रिया बंधू धनंजय मुंडे यांची आहे.यापाठोपाठच त्यांचे दुसरे भाऊ जि.प.गटनेते अजय मुंडे यांनीही पंकजाताईंना धीर दिला आहे. अजय मुंडेंनी ट्वीट करत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे, 'ताई, वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल,या प्रसंगात भाऊ म्हणून पाठीशी आहे , काळजी घ्या ताई.'

MB NEWS-मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच', धनंजय मुंडेंचा पंकजा यांना भावनिक आधार

इमेज
  मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच', धनंजय मुंडेंचा पंकजा यांना भावनिक आधार परळी वैजनाथ, प्रतिनिधी: भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर पंकजा मुंडेंना अनेक कार्यकर्त्यांचे आणि चाहत्यांचे काळजी घ्यावी अशा कमेंट आल्या. पण सर्वात महत्त्वाची आणि भावनिक प्रतिक्रिया बंधू धनंजय मुंडे यांची आहे. धनंजय मुंडेंनी ट्वीट करत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे, 'ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई.'

MB NEWS-*पंकजाताई मुंडे कोरोनाबाधित ; कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह* _संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन_

इमेज
  *पंकजाताई मुंडे कोरोनाबाधित ; कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह*  _संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन_   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून आता माजीमंत्री तथा भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.आज सकाळी त्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.      भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे कोरोना पाॅझिटिव्ह आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त पंकजाताई मुंडे यांच्या फेसबुकवर देण्यात आले आहे.दरम्यान, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून आपण घरात आयसोलेट झालेलो आहोत.आज सकाळी रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. सर्वांनी काळजी घ्यावी,सोशल डिस्टंसिंग पाळत कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.तसेच आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते, नागरिक यांनी टेस्ट करून घ्यावी असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

MB NEWS-प्रा. सिध्दार्थ तायडे यांना पितृशोक

इमेज
  प्रा. सिध्दार्थ तायडे यांना पितृशोक      परळी  ( प्रतिनिधी )  प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, नाटककार प्रा. सिध्दार्थ तायडे यांचे  वडिल  आंबेडकरी चळवळीतील लोकगायक आबाजी तायडे यांचे अल्पशा आजाराने आज मध्यरात्री अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते.     आबाजी तायडे हे विद्युत मंडळातून  सेवानिवृत्त झाले होते.  त्यांचे काल अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात मध्यरात्री निधन झाले. ते सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीय असायचे. आंबेडकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. ते गायक म्हणून समाजाला परिचित होते.  सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक  व नाटककार प्रा. सिध्दार्थ तायडे यांचे ते वडील होत.       त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळव्यक्त होत आहे. परळी सिने  नाट्य कलावंत संघटनेच्या वतीने आबाजी तायडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

MB NEWS-तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करा- कॉ. अजय बुरांडे*

इमेज
 * तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करा- कॉ. अजय बुरांडे* *लसिचा पुरवठा सुरळीत करा* *प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड तपासणी चालु करा* परळी वै. ता. २८ प्रतिनिधी      तालुक्यातील ग्रामीण भागातील रूग्नांच्या सोयीसाठी व तालुक्याच्या ठिकाणी येणारा भार कमी करण्यासाठी तालुक्यातील पाच ही प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.      परळी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रूग्नाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. तालुक्याच्या ठिकाणी येउन कोरोणा तपासणी करूण घेण्यात उपचार करूण घेण्यासाठी रूग्न टाळाटाळ करत आहे. परिणामी अनेक गावात रूग्न संख्या दररोज वाढत आहे. ग्रामीण भागातील रूग्नांना सोयीचे व जवळचे ठिकाण हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तालुक्यातील मोहा, सिरसाळा, पोहनेर, नागापुर व धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे भव्य वास्तुत आहेत. सर्व सोयीनीयुक्त असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कोविड सेंटर सुरू करावे. नागरिक लसिकरणासाठी पुढे येत असताना लसीचा पुरवठा सुरळीत करावा, तालुक्य