MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा आगळा- वेगळा संकल्प* *आता शोकाकुल कुटुंबियांनाही देणार मायेचे दोन घास !*

 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा आगळा- वेगळा संकल्प*



*आता शोकाकुल कुटुंबियांनाही देणार मायेचे दोन घास !* 


परळी । दिनांक ०५। 

एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या घरात चूल पेटवली जात नाही, अशा कुटुंबियांसाठी त्यांच्या परवानगीने  तीन दिवस भोजनाची व्यवस्था करण्याचा निर्णय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने घेतला आहे.

प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या या आगळया-वेगळया संकल्पाने त्यांची प्रत्येकांशी असलेली कौटुंबिक नाळ अधिक दृढ होणार आहे. 


समाजातील प्रत्येकांना कधी ना कधी दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागते. एखाद्या कुटुंबात कुणी मयत झाला तर त्याच्याकडे किमान तीन दिवस चूल पेटत नाही, अशा परिस्थितीत नातेवाईक जवळपास असतील ठिक पण अनेकांकडे  जेवणाची सोय होऊ शकत नाही. यासाठी पंकजाताई मुंडे यांनी प्रत्येकांची नातेवाईक होण्याचे ठरवले आहे. कुणाच्या घरी मृत्यू अथवा दुःखद प्रसंग घडला तर त्यांचेशी संपर्क साधून त्यांच्या परवानगीने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत तीन दिवस भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला आले आहे अशा कुटुंबाचे अभिनंदन करून त्यांना मिठाई देखील पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटात पंकजाताई मुंडे यांनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रूग्णसेवा तर सुरू केलीच आहे शिवाय या दोन्ही आगळ्या- वेगळ्या संकल्पनेतून त्यांचे मतदारसंघात पिढ्या न पिढ्या असलेले कौटुंबिक नाते अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया सर्व सामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !