MB NEWS-मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करणारा* *निकालानंतर पंकजाताई मुंडे यांचं ट्विट*

 *मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करणारा*



*निकालानंतर पंकजाताई मुंडे यांचं ट्विट*


मुंबई । दिनांक ०५। 

मराठा समाजाच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल अंतर्मुख करणारा आहे. समाजातील तरूणांईसमोर आता भविष्यात प्रश्नचिन्ह आहे. आमचा प्रमाणिक 'नायक' कोण ? आरक्षणाचा खरा 'टक्का' कोण सांगेल आणि देईल ? असा सवाल माझे मराठा समाज बांधव विचारत आहेत असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.


सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवगातंर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निकाल आज दिला. यावर पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करतो, निकाल असा लागणारच नाही असं खरंच कोणाला वाटलं होतं का ? मराठा समाजाचा संघर्ष मोर्चा, बैठका,आरोप -प्रत्यारोप आणि राजकारण याखाली दबून गेला आहे. झालं तर मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी आहे. समाजाला अवास्तव शब्द दिले आणि समाजाची प्रतारणा झाली अशी भावना आहे. आता भविष्यात तरुणाई समोर प्रश्नचिन्ह आहे. आमचा प्रामाणिक “नायक” कोण? आरक्षणाचा खरा “टक्का” कोण सांगेल आणि देईल, हा प्रश्न माझे मराठा समाज बांधव विचारत आहेत, असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार