युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-*पंकजाताई मुंडे कोरोनाबाधित ; कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह* _संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन_

 *पंकजाताई मुंडे कोरोनाबाधित ; कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह*



 _संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन_ 

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून आता माजीमंत्री तथा भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.आज सकाळी त्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

   

 भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे कोरोना पाॅझिटिव्ह आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त पंकजाताई मुंडे यांच्या फेसबुकवर देण्यात आले आहे.दरम्यान, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून आपण घरात आयसोलेट झालेलो आहोत.आज सकाळी रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. सर्वांनी काळजी घ्यावी,सोशल डिस्टंसिंग पाळत कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.तसेच आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते, नागरिक यांनी टेस्ट करून घ्यावी असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या