MB NEWS-महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करू - धनंजय मुंडे* *महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा*

 *महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करू - धनंजय मुंडे*



*महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा*


बीड (दि. 30) ---- : महाराष्ट्र राज्य सरकारने व्यापक कोविड लसीकरण मोहीम हाती घेतली असून वय वर्ष 18 ते 44 मधील सर्व नागरिकांना आता मोफत लस देण्यात येणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या व्यापक लसीकरण मोहिमेस पाठबळ देण्यासह महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करू असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 


महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ना. मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. वातावरणात वाढती उन्हाची दाहकता आणि त्यात रोज वाढणारी संसर्गाची आकडेवारी एकीकडे चिंताजनक रूप धारण करत आहेत, त्यात आरोग्य विभागासह सर्व प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कष्ट घेऊन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 


जिल्हा वासीयांनी या प्रयत्नांना यश यावेत यासाठी आपली जबाबदारी ओळखून यंत्रणांना सहकार्य करणे आता अनिवार्य आहे. सर्वव्यापी लसीकरण मोहिमेत पात्र असणाऱ्या प्रत्येकाचे वेळेत लसीकरण व्हावे यासाठी धोरण निश्चित करण्यात येत आहे. याचा लाभ सर्व स्तरातील नागरिकांनी घ्यावा. 


महाराष्ट्राला कोणत्याही कठीण परिस्थितीवर कणखरपणे मात करण्याची परंपरा राहिलेली आहे, कामगारांनी, कष्टकऱ्यांनी या भूमीला आपल्या घामाचे मोल देऊन जोपासले व समृद्ध केलेले आहे. याचा अभिमान बाळगून आज या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे व आपापली जबाबदारी ओळखून वागणे गरजेचे आहे, असेही ना. मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.


उद्या दि. 1 मे रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मर्यादित निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत व साधेपणाने साजरा केला जाणार आहे.


*शनिवारी ना. मुंडे घेणार जिल्ह्याच्या कोविड परिस्थितीचा आढावा*


दरम्यान 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शासकीय ध्वजरोहण समारंभांनंतर ना. धनंजय मुंडे हे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील एकूण कोविड परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता यासह सर्व विभागातील प्रमुख अधिकारी व महत्वाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !