MB NEWS-.....अन्यथा राज्यात मुंडन आंदोलन करणार -सुरेंद्र कावरे

  .....अन्यथा राज्यात मुंडन आंदोलन करणार -सुरेंद्र कावरे



परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

लोकांनी अन्नधान्य दिल्यानंतर ज्यांची उपजीविका भागते अश्या गावगाढा चालवणार्‍या बलुतेदारांना राज्य सरकारने मदत जाहीर केली नाही. जर बारा बलुतेदारांवर अन्याय होत असेल तर राज्यात लवकरच नाभिक समाज राज्य सरकारच्या निषेधार्ध मुंडन आंदोलन करून आपल्या बंद दुकानावर जाहीर निषेधाचे फलक लावणार आहे. असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे युवक प्रदेशअध्यक्ष सुरेंद्र कावरे यांनी दिला आहे.  नाभिक समाजाच्या २९ आत्महत्या झाल्या एका ही लोकप्रतिनिधीने साधी चौकशी ही केली नाही किंवा कसलीही मदत पण केली नाही राज्य सरकारने या २९ कुटुबिंयाना १० लाखाची आर्थिक मदत लवकर जाहीर करावी घरातील कर्ता मानुस गेल्यामुळे कुटुंब उघडयावर पडले आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सुुतार,लोहार,कुभांर,धोबी यांच्या सारख्या अनेक छोटया छोटया अनेक व्यवसायीकांवर कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे अनेक जन व्यवसायिक शहर सोडुन गावाकडे तर कोणी शेताकडे जाऊन राहिले आहेत हे लॉकडॉउन किती दिवस चालणार आहे हे कोणी सुध्दा सांगु शकत नाही गेली दोन महिने झालेदुकानदारी बंद आहे बलुतेदारांना जगण्याचे साधन ही उरले नाही कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या परिस्थितीत जगायचे कसे. या अगोदर राज्य शासनाला अनेक निवेदन दिले आंदोलन केली.

तरी कसली ही मदत राज्य सरकराने केली नाही. झोपेचे सोंग घेणार्‍या या राज्य सरकारला झोपेतुन जागे करण्यासाठी आता महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने राज्य शासनाच्या विरूध्दात मुंडन आदोंलन लवकर करण्यात येणार आहे असा ईशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे यांनी दिले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार