MB NEWS-दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी; गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना होतोय त्रास

 दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी; गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना होतोय त्रास 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...... कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या प्रचंड गर्दीचा वयोवृद्ध लोकांना त्रास होताना दिसून येत आहे. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता दुसऱ्या डोस साठी आलेल्या नागरिकांची स्वतंत्रपणे व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरा डोस घेणारे नागरिक हे वयोवृद्ध असून त्याचा त्रास दूर करावा अशी मागणी होत आहे.

      गेल्या एक तारखेपासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात येत आहे. परंतु ही लस घेण्यासाठी तोबा गर्दी होताना दिसत आहे. यामध्ये दुसरा डोस घेण्यासाठीही नागरिक गर्दी करत असून दुसरा डोस घेणाऱ्यांची वयोमर्यादा ही पंचेचाळीस च्या पुढची आहे. वयोवृद्ध नागरिक ह्यात भाऊ पाऊस असल्याने गर्दीमुळे ताटकळत बसण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रावर या नागरिकांना घटून घंटे बसावे लागत आहे. सोशल डिस्टंसिंग गर्दीचा त्रास यामुळे जीव गुदमरून जात आहे .यासाठी दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था प्रत्येक वशीकरण केंद्रावर करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार