MB NEWS-पुरोहिताला थोबाडीत मारणं पडलं महागात, जिल्हाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं !

 पुरोहिताला थोबाडीत मारणं पडलं महागात, जिल्हाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं !




त्रिपुरा | त्रिपुरातील आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी लग्नात घुसून वऱ्हाडींवर कारवाई केली होती. मात्र कारवाई दरम्यान वऱ्हाडींशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.धार्मिक विधी करणार्या पुरोहिताला थोबाडीत मारलं होतं.ब्राह्मणाला मारणं जिल्हाधिकारी यांना महागात पडलं असुन या जिल्हाधिकाऱ्याला सध्या पदावरुन हटवलं गेलं आहे.गैरवर्तन करणारे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांचं निलंबन करून त्यांना पदावरुन हटवण्यात आलंय.


     पश्चिम त्रिपुरातील लग्न समारंभात जाऊन आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी वधू-वरासह पाहुण्यांनाही हुसकावून लावलं होतं. तसेचधार्मिक विधी करणार्या पुरोहिताला थोबाडीत मारलं होतं. या घटनेचा व्हिडीओ झाल्यानंतर काही जणांनी त्यांच्या दबंग कारवाईचं कौतुक केलं होतं, मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली.

शैलेश यादव यांनी माफीही मागितली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. परंतु अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

  1. जिल्हाधिकाऱ्यांना कोणालाही मारण्याचा अधिकार नसतो..,....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अजिबात नाही,स्वता भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्याने एखाद्या निरपराध लोकांना मारने चुकीचे आहे

      हटवा
    2. नसतोच
      मारणे तर दुर, हुसकावून बोलण्याचा सुद्धा अधिकार नसतो. या साठी पोलीस प्रशासन प्रशस्त आहे.

      हटवा
  2. जिल्हाधिकारी असले म्हणजे समाजाशी गैर वर्तन करू नये

    उत्तर द्याहटवा
  3. जास्त शिकुन मोठ्या हुदयावर गेलेल्या बड्या अधिकार्याने बेअक्कल आसल्यासारखे वागु नये, त्यांना शोभत नाही

    उत्तर द्याहटवा
  4. हा हिंदू पुजारी आहे म्हणून मारलं ! एखाद्या इमामाला , बिशप पाद्र्याला हा हात तरी लावू शकेल का ? लावला तर किती ठिकाणी काय काय होईल ?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !