MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सेवा यज्ञ ; आयसोलेशन सेंटरच्या रूग्णांसाठी उद्यापासून नांव नोंदणी* *कोरोना बाधित महिला रूग्णांच्या परिवाराला घरपोच भोजनाचीही होणार व्यवस्था*

 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सेवा यज्ञ ; आयसोलेशन सेंटरच्या रूग्णांसाठी उद्यापासून नांव नोंदणी* 




*कोरोना बाधित महिला रूग्णांच्या परिवाराला घरपोच भोजनाचीही होणार व्यवस्था*


परळी । दिनांक ३०।

कोरोना संक्रमित रूग्णांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने 'सेवा यज्ञ ' सुरू करण्यात येत आहे. प्रतिष्ठानच्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरसाठी रूग्णांच्या नांव नोंदणीला उद्या १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरवात होणार असून ३ मे पासून सेंटर मध्ये रूग्ण सेवेला सुरवात होणार आहे.


   सध्या सर्वत्र कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून परळी व परिसरात रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा संकट काळात कोरोना रूग्ण व त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून रूग्णांना आयसोलेशन सेंटर व घरपोंच भोजनाची व्यवस्था केली आहे.


*सुसज्ज आयसोलेशन सेंटर* 

-------------------------------

शहराच्या शिवाजी चौकातील अक्षता मंगल कार्यालयात सर्व सोयींनी युक्त असे शंभर बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले असून प्रसिद्ध डाॅ. हरिश्चंद्र वंगे, डाॅ. शालिनी कराड, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. यशवंत देशमुख, डाॅ. दिपक पाठक, डाॅ. वाल्मिक मुंडे आदींचे सल्ला व मार्गदर्शन लाभणार आहे. या सेंटर मध्ये लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रूग्णांवर मोफत औषधोपचार, नाश्ता, जेवण, तज्ज्ञ डाॅक्टर्स कडून तपासणी आदी केले जाणार आहे. पिण्याचे पाणी, लाईट, स्वच्छतागृह आदी सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा येथे असून रूग्णांची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे. कोरोना बाधित महिला रूग्णांच्या परिवाराला घरपोच मोफत जेवणाचा डब्बा देखील दिला जाणार आहे. प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यासाठी मेहनत घेत आहेत. 


*१ मे पासून नांव नोंदणी*

--------------------------

आयसोलेशन सेंटर व घरपोंच जेवणाचा डब्बा यासाठी रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उद्या १ मे पासून नांव नोंदणी करता येणार आहे. आयसोलेशन सेंटर करिता शहरासाठी - जुगलकिशोर लोहिया (९४२२२४१९५०), उमेश खाडे (९४२३२७७७३१), योगेश पांडकर (९८२३७७५०४४), गोविंद चौरे (९७६३२४३३३३) ग्रामीण साठी सतीश मुंडे (९४०५२५७७७७), शिवाजीराव गुट्टे (९६२३४४३७२१), उत्तम माने (९८६०३३९३२६), रवि कांदे(९०२८०३४२४२), सुरेश माने (९४०३३०१२१२) अंबाजोगाई ग्रामीण साठी जीवनराव किर्दंत (९४०५००१२१२), प्रदीप गंगणे (९८३४३०८४८२), गणेश कराड (९८२२६४२२२२), शिवाजी गिते (९४२१३४३२५५), बंडू चाटे (९४०३७७६५१७) *घरपोंच भोजन* व्यवस्थेसाठी - राजेंद्र ओझा (८२०८०८३४३७), सचिन गित्ते (९४२१३५८८८८) नितीन समशेट्टी (९८२२४७८१२२) चंद्रकांत देवकते (९८२३०७९२९३) यांना संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार