MB NEWS-जोशी कुटुंबियांचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

  जोशी कुटुंबियांचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन



परळी (दि. 30) : परळी शहरातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार भास्करराव जोशी यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले होते, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज भास्करराव जोशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी व ना. मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्यासह जोशी कुटुंबातील सदस्यांचे ना. मुंडे यांनी सांत्वन केले 


जुन्या पिढीतील अत्यंत अभ्यासू पत्रकार म्हणून भास्करराव जोशींची ओळख होती, पुणे येथे दै. तरुण भारत या वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. तद्नंतर परळी येतील साप्ताहिक जगमित्र चे ते संस्थापकीय संपादक होते. अलीकडच्या काळात अनेक पत्रकार-लेखकांना ते मार्गदर्शन करत. 


भास्करराव जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रशांत हे ना. धनंजय मुंडे यांचे तब्बल 20 वर्षांहून अधिक काळापासून स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यामुळे साहजिकच जोशी कुटुंबियांशी ना मुंडे यांचा दीर्घकाळापासून स्नेह आहे. 


स्व. भास्करराव जोशी हे जुन्या पिढीतील एक ज्येष्ठ पत्रकारच नव्हे ते आमचे मार्गदर्शकही होते. जनसंघाच्या सुरुवातीच्या काळापासून परळीत सक्रिय पत्रकारितेसह त्यांनी समाजकार्यात योगदान दिले. त्यांच्या निधनाने आम्ही एक पितृतुल्य मार्गदर्शकाला मुकलो आहोत, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. यावेळी जोशी कुटुंबियांसह राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष अजय जोशी, सचिन जोशी, पत्रकार अनंत कुलकर्णी, वैजनाथ जोशी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार