MB NEWS- *दिलासादायक:ज्योतीषशास्त्राच्या कांगोऱ्यातून कोरोनाचे विश्लेषण*

 *दिलासादायक:ज्योतीषशास्त्राच्या कांगोऱ्यातून कोरोनाचे विश्लेषण*

---------------------------------

_10 मे 2021 पासून स्थिती नियंत्रणात येणे सुरू होईल तर 22 मे 2021 नंतर परिस्थितीमध्ये जलद गतीने सुधारणा_

--------------------------------




मानवाची कितीही प्रगती झाली तरी मनातील चिंता, अस्थिरता, नैराश्य काही केल्या कमी होत नाहीत. ती दूर करून आत्मसुखाचा मंगल वर्षाव व्हावा या हेतूने सदर ज्योतिषीय विश्लेषण करण्यात येत आहे.

गुरु हा सूर्यमालेतील पाचवा ग्रह. अत्यंत शक्तिशाली बृहस्पती, जे समस्त देवांचे गुरु असून विश्वातील चित्तशक्तीचे कारक व तेजोरुपी आनंद आहेत म्हणूनच गुरु हा सच्चिदानंद आहे. सच्चिदानंदाचे अधिष्ठान असल्याखेरीज संसारात शांतता, समाधान व सौख्य मिळणार नाही त्यामुळे प्रत्येक कार्यात गुरूचे सहाय्य घ्यावेच लागते. ज्यावेळी त्यांच्या विशाल गर्जनेने संपूर्ण विश्व हादरून जाते, त्या गुरूचे साहाय्य असल्याशिवाय शांतता समाधान मिळूच शकत नाही.

परंतु ज्यावेळी हा गुरु ग्रह नक्षत्र राशी ने दूषित होतो, त्यावेळी पृथ्वीतलावर हाहाकार माजतो. त्याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक व भयावह असतात. पण या गुरुची स्थिती सुस्थितीत असल्यास त्याच्या दृष्टीत मातीचं सोनं करण्याची किमया आहे. गुरु ज्यावेळी भ्रमण काळात दूषित होतो त्यावेळी सर्दी, पडसे, खोकला, फुफ्फुसे, डायबिटीस इत्यादी आजाराची निर्मिती होते व प्रचंड वेगाने त्याचा प्रादुर्भाव व प्रसार होतो. त्यामुळे मार्च 2021 पासून हा आजार वाढण्यास सुरुवात झाली. दिनांक 5 एप्रील 21 पासून गुरुचा कुंभ राशीतील धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश झाला. हे क्रूर नक्षत्र असून त्यांचा नक्षत्रस्वामी मंगळ हा विध्वंसक स्फोट, रक्तस्त्राव, अपघात, उष्णता यांचा कारक आहे. या नक्षत्रात गुरुचा शुभ प्रभाव कमी झाला तसेच मंगळाचे अशुभ गुणधर्मामुळे या काळात अत्यंत विदारक स्थिती निर्माण झाली. शासन व जनता अत्यंत चिंतातुर होत आहे. आरोग्याचा कारक रवी केतूच्या नक्षत्रात असणे व शनी हा वायुतत्वाचा ग्रह श्रवण नक्षत्रात असणे ही स्थिती अनुकूल नाही. या परिस्थितीमुळे पृथ्वीवरील शुभ स्पंदनाचा ह्वास झालेला दिसतो.

देशातील अनेक व्यक्तींचे आरोग्य सुस्थितीत असते त्यांचेवर या कोरोना व्हायरसचा परिणाम होत नाही किंवा तो लवकर निघून जातो. याउलट ज्यांचे आरोग्य चांगले नसते त्यांच्यावर हा व्हायरस प्रभावीपणे आपले वर्चस्व प्रस्थापित करून जास्त वाईट परिणाम दर्शवितो. स्मशानभूमी, दवाखाने किंवा गर्दीची ठिकाणे येथे सकारात्मक व्हायब्रेशन चे प्रमाण कमी असते. वरील ग्रहस्थितीमुळे या अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. स्फोट, आग, मृत्यूचे तांडव यांचा कारक मंगळ दिनांक 17 मे 2021 रोजी गुरूच्या पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार आहे तसेच 22 मे 2021 ला गुरू शततारका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. चरण नक्षत्रस्वामी गुरु असल्यामुळे संपूर्ण देशाला या कालावधीत दिलासा मिळेल. गुरुमध्ये अद्भुत शक्ती आहे त्यामुळे संपूर्ण स्थितीवर नियंत्रण मिळण्यास सुरुवात होईल वैद्यकीय सेवा, औषधी पुरवठा इत्यादी विस्कळीत झालेल्या सेवा पूर्वीसारखा अनुकूल राहतील. लसीकरणाचा वेगही वाढेल तसेच आरोग्याचा कारक रवी 29 एप्रिल 2021 पासून भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे व नक्षत्र चरण स्थायी रवि असल्यामुळे परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. या वरील सर्व बाजूचा साकल्याने विचार केल्यास दिनांक 10 मे 2021 पासून स्थिती नियंत्रणात येणे सुरू होईल. दिनांक 17 मे व 22 मे 2021 नंतर परिस्थितीमध्ये जलद गतीने सुधारणा होतील. जून महिन्यापासून स्थिती पूर्णतः नियंत्रणात येईल तोपर्यंत आपण सर्वांनी वरीलप्रमाणे ग्रहांचा अनिष्ट काळ जाईपर्यंत स्वतःला व कुटुंबाला जपणे सोयीस्कर राहील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !