युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-ना.धनंजय मुंडे पाठोपाठ भाऊ अजय मुंडेंनीही दिला पंकजाताईंना धीर

ना.धनंजय मुंडे पाठोपाठ भाऊ अजय मुंडेंनीही दिला पंकजाताईंना धीर



परळी वैजनाथ, प्रतिनिधी: भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर पंकजा मुंडेंना अनेक कार्यकर्त्यांचे आणि चाहत्यांचे काळजी घ्यावी अशा कमेंट आल्या. यामध्ये भावनिक प्रतिक्रिया बंधू धनंजय मुंडे यांची आहे.यापाठोपाठच त्यांचे दुसरे भाऊ जि.प.गटनेते अजय मुंडे यांनीही पंकजाताईंना धीर दिला आहे.


अजय मुंडेंनी ट्वीट करत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे, 'ताई, वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल,या प्रसंगात भाऊ म्हणून पाठीशी आहे , काळजी घ्या ताई.'


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या