MB NEWS-कोरोना निवारणावर आर्य सभेतर्फे वेब व्याख्यानमाला ‌ डॉ. लहाने यांच्यासह नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार ‌

 कोरोना निवारणावर आर्य सभेतर्फे वेब व्याख्यानमाला

 ‌


 डॉ. लहाने यांच्यासह नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार ‌

. ‌ ‌परळी वैजनाथ (दि.२९)-------- ‌ सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या आजारावर मात करता यावी, यादृष्टीने नागरिकांचे प्रबोधन व्हावे व त्यांना जगण्याचे नवे बळ मिळावे, या उद्देशाने प्रांतीय आर्य प्रतिनिधी सभेतर्फे व्यापक स्तरावर वेब व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना जनजागृती अभियानांतर्गत दि.१ ते ७ मे २०२१ दरम्यान मोबाईलच्या झूम मीटवरुन दररोज सायंकाळी ६.०० वाजता योग, निसर्गोपचार, आयुर्वेद, होमिओपॅथी ,अलोपॅथी ,अध्यात्म , अग्निहोत्र आदी विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्याने संपन्न होतील. यात नामवंत शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल लहाने (लातूर), प्रसिद्ध होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील (लंडन), योगप्रशिक्षक प्रा. डी.एम. शेप (जिंतूर), निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. धनलाल शेंद्रे (नागपूर), यज्ञविशेषज्ञ डॉ. कमलनारायण आचार्य(रायपुर), वैदिक विद्वान पं. राजवीर शास्त्री(सोलापूर), आध्यात्मिक विचारवंत आचार्य सोमदेवजी( राजस्थान) या मान्यवरांचा समावेश आहे. ‌ ‌ या व्याख्यानमालेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९८२२३६५२७२ व ९८९०१०३००४ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून लिंक मिळवावी व अधिकाधिक संख्येने या व्याख्यानांचा लाभ घ्यावा ,असे आवाहन महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान श्री योगमुनी, मंत्री श्री राजेंद्र दिवे , कोषाध्यक्ष श्री उग्रसेन राठौर व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार