MB NEWS-प्रा. सिध्दार्थ तायडे यांना पितृशोक

 प्रा. सिध्दार्थ तायडे यांना पितृशोक 

   


परळी  ( प्रतिनिधी )  प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, नाटककार प्रा. सिध्दार्थ तायडे यांचे  वडिल  आंबेडकरी चळवळीतील लोकगायक आबाजी तायडे यांचे अल्पशा आजाराने आज मध्यरात्री अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. 

   आबाजी तायडे हे विद्युत मंडळातून  सेवानिवृत्त झाले होते.  त्यांचे काल अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात मध्यरात्री निधन झाले. ते सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीय असायचे. आंबेडकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. ते गायक म्हणून समाजाला परिचित होते.  सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक  व नाटककार प्रा. सिध्दार्थ तायडे यांचे ते वडील होत. 

     त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळव्यक्त होत आहे. परळी सिने  नाट्य कलावंत संघटनेच्या वतीने आबाजी तायडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !