युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-दुःखद वार्ता: पत्रकार अनुप कुसुमकर यांना पत्नीशोक

दुःखद वार्ता: पत्रकार अनुप कुसुमकर यांना पत्नीशोक



परळी l प्रतिनिधी

मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे पत्रकार अनुप कुसुमकर यांच्या पत्नी अश्विनी कुसुमकर यांचे आज शुक्रवार दि.30 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 32 वर्षांच्या होत्या.

पत्रकार अनुप कुसुमकर यांच्या पत्नी अश्विनी कुसुमकर यांना आज पहाटेच्या सुमारास झोपेत असतांनाच हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अश्विनी यांच्या पश्चात पती, मुलगा, सासूबाई, दिर,जाऊ असा मोठा परिवार आहे. कुसुमकर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात MB NEWS परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या