MB NEWS-तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करा- कॉ. अजय बुरांडे*

 *तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करा- कॉ. अजय बुरांडे*



*लसिचा पुरवठा सुरळीत करा*

*प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड तपासणी चालु करा*

परळी वै. ता. २८ प्रतिनिधी

     तालुक्यातील ग्रामीण भागातील रूग्नांच्या सोयीसाठी व तालुक्याच्या ठिकाणी येणारा भार कमी करण्यासाठी तालुक्यातील पाच ही प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

     परळी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रूग्नाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. तालुक्याच्या ठिकाणी येउन कोरोणा तपासणी करूण घेण्यात उपचार करूण घेण्यासाठी रूग्न टाळाटाळ करत आहे. परिणामी अनेक गावात रूग्न संख्या दररोज वाढत आहे. ग्रामीण भागातील रूग्नांना सोयीचे व जवळचे ठिकाण हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तालुक्यातील मोहा, सिरसाळा, पोहनेर, नागापुर व धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे भव्य वास्तुत आहेत. सर्व सोयीनीयुक्त असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कोविड सेंटर सुरू करावे. नागरिक लसिकरणासाठी पुढे येत असताना लसीचा पुरवठा सुरळीत करावा, तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड तपासणी सुरू करावी अशी मागणी किसान सभेचे नेते कॉ.अजय बुरांडे, पमचायत समिती सदस्य कॉ.सुदाम शिंदे, कॉ. मुरलीधर नागरगोजो, कॉ. बालासाहेब कडभाने, कॉ.मदन वाघमारे, कॉ पप्पु देशमुख, कॉ. मनोज देशमुख, विशाल देशमुख, मनोज स्वामी यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार