पोस्ट्स

MB NEWS:राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचा उपक्रम

इमेज
  काशी जगदगुरू डॉ.चंद्रशेखर महास्वामी यांच्या हस्ते संत गुरूलिंग स्वामी मंदीरास टयुब संच भेट राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचा उपक्रम परळी वैजनाथ/प्रतिनिधी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती,परळीच्यावतीने वैद्यनाथ मंदीर जवळील संत गुरूलिंग स्वामी मंदीरास लागणारे टयुबसंच ज्ञानसिंहासनाधिश्वर श्रीश्रीश्री 1008 जगदगुरू डॉ.चंद्रशेखर महास्वामी, काशीपीठ यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ष.ब्र.नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज, सोनपेठकर, ष.ब्र.चंद्रशेखर शिवाचार्य महाराज,माजलगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. लिभेर अप्लांयसेस इंडीया प्रायव्हेट लिमिटेड,शेंद्रा,औरंगाबाद येथील कंपनीचे वरीष्ठ व्यवस्थापक श्री.किरण बेंडाळे यांच्याद्वारे  सामाजिक बांधिलकी जपत सीएसआर अंतर्गत मंदीरास लागणा-या टयुब संचाची उपलब्धता करून देण्यात आली. याकरिता राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे, पदाधिकारी सचिन सौंदळे तसेच सर्व सदस्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला तसेच तपोनुष्ठान समितीचे सचिव तथा एस.पी.सप्लायर्सचे प्रो.प्रा.संतोष पंचाक्

MB NEWS:बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

इमेज
  बाळासाहेबांच्या विचारांची धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर मोहिनी-वैजनाथ माने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन परळी (प्रतिनिधी):- बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांच्या विचाराची धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर  मोहिनी होती. त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि 70 च्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख पद मिळताच आपले घरदार नातेवाईक सोडून कार्यालयालाच आपलं घर केलं होतं. आपलं उभ आयुष्य त्यांनी शिवसेनेसाठी समर्पित केले होते. असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे परळी शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय अरुणोदय मार्केट येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले. धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती बाळासाहेबांची  शिवसेना पक्षाच्या वतीने परळी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक या

MB NEWS:चाकुचा धाक दाखवून ट्रकमधुन 12 कट्टे साखर लुटली

इमेज
  चाकुचा धाक दाखवून ट्रकमधुन 12 कट्टे साखर लुटली परळी वैजनाथ...        आमरावती येथील एका ट्रकला अडवून परळीच्या वर्दळीच्या बसस्थानकासमोरील रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून सहा युवकांनी ट्रक मधील बारा साखरेचे कट्टे लुटून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत ट्रकचालकाच्या फिर्यादीवरून अज्ञात सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      परळी बसस्थानक समोर दि. 29/01/2023 रोजी 07.36 वा सहा अनोळखी अंदाजे 20 ते 30 वयोगटाचे आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांना चाकुचा धाक दाखवुन पैसे दे नाहीतर खुपसून टाकत असे म्हणुन धमकी दिली. फिर्यादी याने पैसे नाही असे म्हणाले असता आरोपीतानी फिर्यादीचे ट्रक ची दोरी चाकुने कापूण ट्रक मधुन 12 साखरेचे कट्टे चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी सतीष रामभाऊ धंदर वय 39 वर्ष व्यवसाय ड्रायव्हर रा. गाडगे नगर शेगाव परीसर अमरावती यांच्या फिर्यादीवरून गु.र.न-31/2023 कलम 395 भादवी  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि गोसावी हे करीत आहेत.

MB NEWS:औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: जिल्हाधिकारी यांनी दिली परळीत भेट

इमेज
  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: जिल्हाधिकारी यांनी दिली परळीत भेट परळी वैजनाथ, प्रतिनिधी       औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रिया सुरू असून उद्या दिनांक 30 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी परळी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली.        औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघासाठी परळी तालुक्यात तीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. परळी शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुक्यात धर्मापुरी व सिरसाळा येथे मतदान केंद्र असणार आहे. या मतदान प्रक्रियेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी आज या मतदान केंद्रांना भेटी दिल्या व प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्या समवेत अप्पर जिल्हाधिकारी यादव, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर आदी अधिकारी उपस्थित होते.

MB NEWS:२४ वर्षीय तरुणांची आत्महत्या

इमेज
  २४ वर्षीय तरुणांची आत्महत्या केज :- केज तालुक्यातील बोरगाव येथे एका २४ वर्षाच्या अविवाहित तरुणाने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बोरगाव ता. केज येथील  दयानंद संतोष आरकडे वय (२४ वर्ष ) या गुरे सांभाळणाऱ्या अविवाहित तरुणाने दि. २९ जानेवारी रोजी दुपारी १२:०० च्या दरम्यान बोरगाव शिवारातील उत्तरेश्वर नवनाथ गालफाडे यांच्या गट नं. ३५ मधील बोरीच्या झाडाला साडीच्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  या संदर्भात  मयताचे मामा मधुकर सुकाळे यांनी पोलिसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस नाईक राजू गुंजाळ घटनास्थळी रवाना झाले. प्रेताचा पंचनामा करून प्रेताची उत्तरीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय केज येथे करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली जात आहे.

MB NEWS: पहा:मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सुचना

इमेज
  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची तयारी पूर्ण : परळी तालुक्यात तीन बुथ सर्व मतदान पथके साहित्यासह मतदान केंद्रस्थळी          परळी वैजनाथ:- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ  निवडणूकीची तयारी पूर्ण झाली असून सर्व मतदान पथके  साहित्यासह मतदान केंद्रावर पोहचली आहेत. निवडणुकीसाठी  पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.परळी तालुक्यात मतदानासाठी तीन बुथ आहेत.        औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान उद्या 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक कोणत्याही प्रकारची वस्तु घेऊन जाता येणार नाही. मतदान केंद्रावर अखंडीतपणे व्हिडीओग्राफी व वेबकास्टींग केले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने विभागातील सर्व मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.       शिक्षक मतदार संघासाठी परळी तालुक्यात जवळपास 900 च्या वर मतदान आहे. या दृष्टीने मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे परळी तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार

MB NEWS:स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

इमेज
  स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा   परळी वैजनाथ .... म शि प्र मंडळ संचालित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात मराठी विभागातर्फे मोठ्या उत्साहात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' दिन (27 जानेवारी) रोजी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ वनमाला गुंडरे, प्रमुख वक्ते मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य व कै लक्ष्मीबाई देशमुख महिला  महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ राजकुमार  यल्लावाड तसेच प्रा संकेत हंडीबाग  व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्ते डॉ राजकुमार यल्लावाड यांना  यांनी 'गाऊ मराठीचे गोडवे ' या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला पाहिजे असे मत मांडले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ वनमाला गुंडरे यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा संकेत हंडीबाग, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा राघव गव्हाणे यांनी दिला सूत्रसंचालन डॉ श्रीहरी गुट्टे तर प्रा दत्ता लव्हाळे यांनी आभार मानले या कार्यक्रमास श्री अजय सोळुंके, प्रा आघाव ,प्रा ईश्व

MB NEWS:परळी :रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पुर्ण; नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन

इमेज
  परळी :रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे काम पुर्ण; नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन परळी ते लातुर रोड या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पुर्ण असून या विद्युत पोल मध्ये 25000 wt विद्युत प्रवाह चालू असून जनतेनी, पशुपालकांनी विद्युत पोल जवळ किंवा स्पर्श न करण्याचे आवाहन मुख्य विद्युत अभियंता, दक्षिण मध्य रेल्वे पी.डी. मिश्रा यांनी केले आहे.            दक्षिण मध्य रेल्वे विभागातील शेवटचे परंतु उत्पन्नाच्या बाबतीत परळी जंक्शन आघाडीवर असुन परळी ते लातुररोड हे 63.75 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असुन मुख्य विद्युत अभियंता, दक्षिण मध्य रेल्वे, श्री पी.डी. मिश्रा यांनी 28.01.2023 रोजी नवीन विद्युतीकरण केलेल्या लातूर रोड - परळी वैजनाथ (63.75 मार्ग किलोमीटर) विभागाची पाहणी केली आहे.         रेल्वे विभागाचा प्रति किलोमीटर 5 लिटर हा डिझेलवर होणारा खर्च विद्युतीकरणामुळे निम्म्यावर येणार आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी हे एक ज्योतिलिंग असुन या ठिकाणी औष्णिक वीजनिर्मिती केंद्र असल्याने सिकंदराबाद झोन मधील परळी हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. परळी येथील प्रभू वैद्यना

MB NEWS:सुसंवाद व विश्वास संपल्याने तरुणाई अधोगतीकडे :वैद्यनाथ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात कवी साळेगावकर

इमेज
  सुसंवाद व विश्वास संपल्याने तरुणाई अधोगतीकडे :वैद्यनाथ महाविद्यालयाच्या  स्नेहसंमेलनात कवी साळेगावकर    परळी वैजनाथ,दि.२९--                  आधुनिक समाजमाध्यमांचा वाढता दुरुपयोग व चंगळवादी दुनियेची बेसुमार अगतिकता यांमुळे आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात अधोगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यासाठी तरुणाईने माणुसकी, प्रेम, सामाजिक भान व राष्ट्रभक्ती इत्यादी श्रेष्ठ गोष्टींशी स्वतःला जोडून घ्यावे, असे आवाहन प्रसिद्ध कवी श्री प्रभाकर साळेगावकर यांनी केले.       येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात काल (शनिवारी) आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. मेश्राम हे होते. सामाजिक कार्यकर्ते श्री राजसिंह शेखावत यांच्या हस्ते यावेळी या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विष्णू कुलकर्णी, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. पी. एल. कराड, उपप्राचार्य एच.डी. मुंडे, पर्यवेक्षिका प्रा. एम.व्ही. पेकमवार, समन्वयक यू. आर.कांदे, विद्यार्थी संसद प्रतिनिधी कु. अंजली मुंडे इत्यादी उप

MB NEWS:कामगार भजन स्पर्धेचे शानदार उद्घाटन

इमेज
  भजन हे सामाजिक संस्कार निर्माण करणारे माध्यम- प्रधान सचिव विनिता वेद- सिंगल यांचे प्रतिपादन  कामगारांच्या जीवनात भजन आनंद फुलविते- कल्याण आयुक्त रविराज इळवे कामगार भजन स्पर्धेचे शानदार उद्घाटन परळी (प्रतिनिधी) :   भजन हे ईश्वराशी संवाद साधण्याचा मार्ग आहे. भजनामुळे सामाजिक संस्कार निर्माण होते. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा नष्ट करण्याचे मोठे माध्यम भजन असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात भजनाला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद -सिंगल यांनी केले. त्या  राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.  यावेळी व्यासपीठावर लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. चे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे, दै. सकाळचे निवासी संपादक दयानंद माने, सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पडियाल, कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांची उपस्थिती होती.   तणाव कमी करण्यासाठी भजन करणे गरजेचे असून, दुःख पेलण्याचे सामर्थ्य ही भजनामुळे  माणसात निर्माण होते. भजनाचे संस्कार प्रत्येकाने आपल्या मुलांना द्यावे असे आवाहन विनिता-वेद सिंगल यांनी केल

MB NEWS:लेकरांना प्रेम द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना वेळ द्या -आदर्श शिक्षक सोमनाथ वाळके

इमेज
  लेकरांना प्रेम द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना वेळ द्या -आदर्श शिक्षक सोमनाथ वाळके परळी वैजनाथ... लेकरांना प्रेम द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना वेळ द्या असे तीन मंत्र स्कॉलर केजी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री सोमनाथ वाळके यांनी पालकांशी हितगुज करताना दिले.  शनिवारी स्कॉलर केजी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनात आष्टी येथील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री सोमनाथ वाळके सर प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात हा सोहळा संपन्न झाला. बीड येथील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री शशिकांत कुलथे, परळीचे नगरसेवक प्राध्यापक पवन मुंडे संतोष पोकळे यांचीही यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.  सुरुवातीला अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले अतिथींच्या स्वागतानंतर प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता चंद्रशेखर फुटके यांनी केले. आठ वर्षात शाळेने केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. पालकांनी केलेल्या पुरेपूर सहकार्यामुळे

MB NEWS:दम रेल्वेचे प्रधान मुख्य विद्युत अभियंता यांनी केली विद्युतीकरण पहाणी : आज प्रत्यक्ष इंजिन चाचणी

इमेज
  दम रेल्वेचे प्रधान मुख्य विद्युत अभियंता यांनी केली विद्युतीकरण पहाणी : आज प्रत्यक्ष इंजिन चाचणी परळी वैजनाथ....        प्रधान मुख्य विद्युत अभियंता, दक्षिण मध्य रेल्वे, श्री पी.डी. मिश्रा यांनी 28.01.2023 रोजी लातूर रोड- परळी वैजनाथ (63.75 मार्ग किलोमीटर) नवीन विद्युतीकरण विभागाची पाहणी केली 2018-19 च्या रेल्वे अर्थसंकल्पात 244.2 कोटींच्या एकूण मंजूर खर्चासह विकाराबाद- परळी वैजनाथ विभाग (263 रीएट किलोमीटर) मध्ये विद्युतीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. हा प्रकल्प रेल्वे विद्युतीकरण, सिकंदराबाद प्रकल्प, रेल्वे केंद्रीय विद्युतीकरण संस्थेच्या युनिटद्वारे केला जात आहे. विकराबाद-लातूर रोड (२०४.२५ मार्ग किलोमीटर) हा भाग टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आला. लातूर रोड परळी वैजनाथ (63.75 मार्ग किलोमीटर) विभाग सुरू झाल्याने विकाराबाद परळी वैजनाथ (263 मार्ग किलोमीटर) पासून संपूर्ण विभाग पूर्ण झाला आहे. यासह सिकंदराबाद ते परळी वैजनाथ हा संपूर्ण ब्रॉडगेज विभाग 100% विद्युतीकृत आहे. श्री वैजनाथ मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे असलेले एक प्राचीन शिव मंदिर आहे.

MB NEWS:पांगरी येथे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन

इमेज
  पांगरी येथे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन   परळी वैजनाथ दि.२८         येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पांगरी येथे विशेष युवती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या हस्ते करण्यात आले.               लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास युवती विशेष शिबीराचे आयोजन दि.२७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या विशेष युवती शिबीराचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२७) उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे कोषाध्यक्ष प्रसाद देशमुख प्रमुख पाहुणे माजी सरपंच अक्षता सुशिल कराड, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ अमोल गंगणे, मंडळ अधिकारी मंगल मुंडे, माऊली मुंडे,दत्तराव कराड, नंदकिशोर मुंडे,अजित तिडके, महादेव कराड, सचिन तिडकेसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्त

MB NEWS:मिरवट येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्लास्टिक मुक्त अभियान

इमेज
मिरवट येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्लास्टिक मुक्त अभियान  परळी (प्रतिनिधी) :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष शिबिर मौजे मिरवट येथे सुरू झाले असून रासेयोच्या स्वयंसेवकांनी दि.२७ जानेवारी रोजी मिरवट गावात स्वच्छता अभियान राबवले.                थर्मल कॉलनी येथील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन तालुक्यातील मौजे मिरवट येथे करण्यात आले आहे. दि.२४ जानेवारी ते दि.३० जानेवारी रोजी दरम्यान विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. दि.२७ जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मौजे मिरवट गावात प्लास्टिक मुक्ती अभियान राबवत गावाची स्वच्छता केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सदरील उपक्रम प्राचार्य एन.एच. शेंडगे, उपप्राचार्य सुनील लोमटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.अंकुश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहेत.

MB NEWS:नवनिर्वाचित सरपंच,ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

इमेज
 मराठवाडा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी परळी व फारुकी प्राथमिक माध्यमिक शाळा सिरसाळा तर्फे नवनिर्वाचित सरपंच,ग्रामपंचायत सदस्यांचा  सत्कार  सिरसाळा(प्रतिनिधी) मराठवाडा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी परळी व फारुकी प्राथमिक माध्यमिक शाळा सिरसाळा तर्फे नवनिर्वाचित सरपंच,ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य दिव्य सत्काराचा आयोजन दिनांक 28/01/2023 शनिवार रोजी सकाळी 10:00 वाजता करण्यात आला होता,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संस्थे चे अध्येक्ष हाजी महेबुब पाशा सहाब कुरेशी,मुख्य उपस्थिती सचिव अब्दुल मुख्तार उर्फ नवाब पटेल सहाब होते तर प्रमुख पाहुणे मनहून सरपंच अनवर निसार पट्टेदार,उपसरपंच सोहेल एजाज पठाण,नेहाल मणियार, नययुम शेख, उमेर शेख,मोहम्मद शरीफ खुरेशी,काझी इम्रान, शाहेद अक्रम खान, तैफिक दौलत शेख,सईद सादत खान,रामभाऊ किरवले,पत्रकार जावेद पठाण,पत्रकार रफिक पठाण, माजी उपसरपंच अक्रम खान, फेरोज पठाण,फसियुद्दिन इनामदार,हकीम खान,मौलाना मोईन, हाफीज आली,मौलाना अखलाक,दौलत शेख अदी उपस्थित होते,संस्था व शाळा तर्फे सर्वांचे शाल हार आणि गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला प्रस्ताविक माध्यमिक शाळे चे मुख्याध्यापक

MB NEWS:डॉ. बिभीषण जाधव यांची डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

इमेज
  डॉ. बिभीषण जाधव यांची डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड  सोनपेठ, प्रतिनिधी....       डॉक्टर असोसिएशन सोनपेठ च्या अध्यक्षपदी डॉक्टर बिभीषण जाधव यांची निवड करण्यात आली आहे.        डॉक्टर असोसिएशन सोनपेठ च्या  कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. यामध्ये डॉ. बिभीषण देविदास जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. बिभीषण जाधव हे मूळ परळी तालुक्यातील अस्वलंबा येथील आहेत. सोनपेठ येथील सर्वपरिचित डॉक्टर म्हणून ते ओळखले जातात. डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS: शेतकऱ्यांसाठी समाधानकारक निर्णय: पिककर्जासाठी आता सीबील ची गरज नाही !

इमेज
 शेतकऱ्यांसाठी समाधानकारक निर्णय: पिककर्जासाठी आता सीबील ची गरज नाही ! बीड- पीककर्ज असो किंवा इतर कोणतेही कर्ज यासाठी तुमचा सीबील स्कोर चांगला असावा लागतो,या सीबील स्कोर मुळे अनेकदा शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी येतात.मात्र आता सीबील स्कोर ची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सीबील च्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची सुटका होणार हे नक्की. “पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांनी ‘सिबिल’ अथवा ‘सिबिल स्कोअर’चे बंधन घालू नये. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशात त्यासंबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सिबिल स्कोअरची अट न लावता शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे, असे पत्र सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीला पाठवले आहे. शेतकरी पीक कर्ज घेतात आणि त्या पीक कर्जातून शेतात पेरणी केली जाते. या पिकातून आलेल्या पैशांमधून ते पिक कर्जाची परतफेड करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या उभ्या पिकाला बँकेत तारण ठेवलेलं असतं. त्यामुळे पीक कर्जाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची गॅरंटी लागत नाही. तरी देखील बॅंका शेतकऱ्याचे सिबिल पाहूनच त्यांना कर्ज देत असत. परंतु, प

MB NEWS:विद्यार्थी, भाविक व नागरिकांना त्रास होणार्‍या मेरूगिरी मार्गावरील घाण पाण्याची व्यवस्था करा

इमेज
  विद्यार्थी, भाविक व नागरिकांना त्रास होणार्‍या मेरूगिरी मार्गावरील घाण पाण्याची व्यवस्था करा अभयकुमार ठक्कर व सहकार्‍यांचे नगर परिषदेला निवेदन परळी/प्रतिनिधी बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणारे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेवून मेरूगिरी प्रदक्षिणा करणार्‍या भाविकांची संख्या जास्त असते. याच मार्गावर इमदादुल विद्यालयाच्या बाजूस असलेल्या नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने त्याचा त्रास विद्यार्थी, भाविक व नागरिकांना होत असून या घाण पाण्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर व त्यांच्या सहकार्‍यांनी आज निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परळी शहरातील मेरूगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. या ठिकाणी महात्मा बसवेश्वर कॉलनी, नवगण महाविद्यालय असून येथे मोठया प्रमाणात नागरीक राहतात. तसेच याच भागात इमदादुल विद्यालयाच्या बाजूस असणार्‍या नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने भाविक, विद्यार्थी व नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे.

MB NEWS:विद्यार्थ्यांचे शिक्षणासोबत आरोग्य पण सांभाळले पाहिजे- डॉ. निशिगंधा काळेगावकर

इमेज
  विद्यार्थ्यांनी शिक्षणातच नाही तर विविध क्षेत्रात आपले कौशल्य दाखवले पाहिजे-  गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे  विद्यार्थ्यांचे शिक्षणासोबत आरोग्य पण सांभाळले पाहिजे- डॉ. निशिगंधा काळेगावकर परळी वैजनाथ..... 74 प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र इंग्लिश स्कूल परळी शाळेमध्ये ध्वजारोहण शाळेचे अध्यक्ष सुनील जोशी सर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा ठेवल्या होत्या त्या स्पर्धांचे बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात उपस्थिती माननीय गटशिक्षणाधिकारी श्री नवनाथ सोनवणे साहेब, विस्तारअधिकारी हिना अन्सारी मॅम , डॉक्टर मयूर काळेगावकर, डॉक्टर श्री निशिगंधा काळेगावकर मॅडम होते, यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व स्पोर्ट युनिफॉर्म चे वाटप करण्यात आले, प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व आपल्या गाण्यातून तसेच नृत्य प्रदर्शनातून , सर्वांची मने जिंकली, मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता,  कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील

MB NEWS:अनंत दगडगुंडे - गुरुजी यांचे निधन

इमेज
  अनंत दगडगुंडे - गुरुजी यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.२८ - जुन्या गाव  भागातील रहिवासी असलेले अनंत दगडगुंडे - गुरुजी यांचे आज शनिवार दि.२८ रोजी पहाटे ३ वा. निधन झाले,मृत्यसमयी ते ७८ वर्षांचे होते.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांचा सर्वदूर परिचय होता.महापारेषण अधिकारी लक्ष्मीकांत दगडगुंडे यांचे ते वडील तर सुभाष व  राजेंद्र दगडगुंडे यांचे ते बंधू होत. अनंत गणपतराव दगडगुंडे - गुरुजी यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून 38 वर्षे सोनपेठ तालुक्यातील नरवाडी,सुपा,धामोनी,शेळगाव जिल्हा परिषद शाळेत सेवा बजावली होते.त्यांच्या प्रश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वा.परळी येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MB NEWS: सौ.गंगाबाई आश्रुबा काळे यांचे निधन;आश्रुबा दादा काळे यांना पत्निशोक

इमेज
 सौ.गंगाबाई आश्रुबा काळे यांचे निधन;आश्रुबा दादा काळे यांना पत्निशोक परळी (प्रतिनिधी) वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आश्रुबा दादा काळे यांच्या पत्नी सौ.गंगाबाई आश्रुबा दादा काळे यांचे शनिवारी पहाटे दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 67 वर्षे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आश्रुबा दादा काळेआश्रुबा दादा काळे यांच्या पत्नी सौ.गंगाबाई आश्रुबा काळे यांचे आज पहाटे अल्पशा अजाराजे दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शांत, संयमी, सुसंस्कृत आणि धार्मिक स्वभावामुळे त्यांचा लौकिक होता. सौ.गंगाबाई काळे यांच्या पश्चात पती अश्रूबा दादा काळे, मुले शिवाजीराव काळे, पांडुरंग काळे, दोन मुली, सूना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. पौळ पिंपरी येथे आज 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MB NEWS:युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनचा देशव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप

इमेज
  युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनचा देशव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप परळी प्रतिनिधी  बँक ऑफ महाराष्ट्र मधील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनानी मिळून एकत्रित येऊन स्थापन केलेल्या युनायटेड फोरम ऑफ महा बँक युनियन च्या वतीने दिनांक २७ जानेवारी रोजी एक दिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर देण्यात आली आहे.      गेल्या १० वर्षात बँकेचा व्यवसाय २५०० पटीने वाढला आहे. ४५० नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत तर कर्मचाऱ्याची संख्या मात्र २०% ने कमी झाली आहे. बँक गेल्या अनेक वषार्पासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा या मुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील भरत नाही याचा परिणाम म्हणून लोकांना रोज जास्त वेळ काम करावे लागते. सुट्टीच्या दिवशी देखील कामावर यावे लागते यामुळे कौटुंबिक जबाबदान्या पार पाडणे अशक्य झाले आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतआहे. त्यांच कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे समाधानकारक ग्राहक सेवा देता येणे अशक्य झाले आहे. याचा बँकेच्या व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत आहे.      महा बँकेतील कर्मचारी विलक्ष

MB NEWS:भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

इमेज
  परळी औष्णिक विद्युत केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा  भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक  वाचन  परळी प्रतिनिधी  २६ जाने २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पी. एन. भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र सुरक्षा दल व मेस्कोच्या जवानांनी परेड सादर केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.  याप्रसंगी  मुख्य अभियंता पी. एन. भदाणे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले कि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी आपल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून अमलात आणून नव्या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात केली. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले परंतु २६ जानेवारी १९५० पासून भारत देश लोकशाही गणतंत्र देश म्हणून जगभरात उदयास आला. भारत देशात लोकशाही पद्धतीने कामकाज सुरु झाल्याने प्रत्येक नागरिकास स्वतंत्र, समता, बंधुता व न्याय हि मानवी विकासाची मूल्य प्राप्त करण्यासाठी भारतीय संविधानाचा आधार घेऊन आपण वाटचाल करत आहोत. ज्ञान विज्ञानाच्या तंत्रज्ञानात जगभरात क्रांती झाली आहे. आपणही या तंत्रज्ञ

MB NEWS:सकारात्मक पत्रकारितेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून लाखोंचे पुरस्कार

इमेज
सकारात्मक पत्रकारितेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून लाखोंचे पुरस्कार - चला बदल घडवू ः राज्यातील पत्रकारांसाठी स्पर्धा - महिला पत्रकारांसाठी 51 हजारांचे खास बक्षीस - राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार दिमाखदार सोहळा   प्रतिनिधी । बीड दि.27 : सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची निर्मिती झाली आहे. जी संघटना सध्या देशात 23 राज्यांत कार्यरत आहे. ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ अजून रुजावे, या उद्देशाने या वर्षीपासून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड सुरू केला आहे. या स्पर्धेत रोख अडीच लाख रुपयांचे चार पुरस्कार, विशेष पाच पुरस्कार, सर्व सहभागी स्पर्धक पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा माने, शेट ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशीष ब्रिजमोहन लढ्ढा, यांनी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर

MB NEWS:हजारो विद्यार्थ्यांनी ऐकली पंतप्रधानांची 'परीक्षा पे चर्चा'

इमेज
  परिक्षा पे चर्चा अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे थाटात पारितोषिक वितरण   पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून विजेत्या स्पर्धकांना  शैक्षणिक साहित्यासह आकर्षक बक्षीसं खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान ; हजारो विद्यार्थ्यांनी ऐकली पंतप्रधानांची 'परीक्षा पे चर्चा' परळी वैजनाथ । दिनांक २७ । 'परीक्षा पे चर्चा' एक्झाम वॉरियर्स उपक्रमांतर्गत पार पडलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण शहरातील महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आज उत्साहात संपन्न झाले.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धेतील सहभागी आणि विजेत्यांना खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त ठरणा-या  साहित्यासह आकर्षक बक्षीसे  वितरित करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा' या उपक्रमातून परळी शहरातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे