MB NEWS:विद्यार्थ्यांचे शिक्षणासोबत आरोग्य पण सांभाळले पाहिजे- डॉ. निशिगंधा काळेगावकर

 विद्यार्थ्यांनी शिक्षणातच नाही तर विविध क्षेत्रात आपले कौशल्य दाखवले पाहिजे-  गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे 




विद्यार्थ्यांचे शिक्षणासोबत आरोग्य पण सांभाळले पाहिजे- डॉ. निशिगंधा काळेगावकर

परळी वैजनाथ.....

74 प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र इंग्लिश स्कूल परळी शाळेमध्ये ध्वजारोहण शाळेचे अध्यक्ष सुनील जोशी सर यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा ठेवल्या होत्या त्या स्पर्धांचे बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात उपस्थिती माननीय गटशिक्षणाधिकारी श्री नवनाथ सोनवणे साहेब, विस्तारअधिकारी हिना अन्सारी मॅम , डॉक्टर मयूर काळेगावकर, डॉक्टर श्री निशिगंधा काळेगावकर मॅडम होते, यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व स्पोर्ट युनिफॉर्म चे वाटप करण्यात आले, प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व आपल्या गाण्यातून तसेच नृत्य प्रदर्शनातून , सर्वांची मने जिंकली, मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता,  कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील सर्व शिक्षक श्री आदमाने प्रीतम सर, सौ अनिता लाहोटी मॅडम, नेहा मॅडम, मोगरकर मॅडम, बनसोडे मॅडम, ठाकूर मॅडम, गौरी जोशी मॅडम, पवार मावशी यांनी केले. अशाप्रकारे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !