MB NEWS:हजारो विद्यार्थ्यांनी ऐकली पंतप्रधानांची 'परीक्षा पे चर्चा'

 परिक्षा पे चर्चा अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे थाटात पारितोषिक वितरण  


पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून विजेत्या स्पर्धकांना  शैक्षणिक साहित्यासह आकर्षक बक्षीसं


खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान ; हजारो विद्यार्थ्यांनी ऐकली पंतप्रधानांची 'परीक्षा पे चर्चा'


परळी वैजनाथ । दिनांक २७ ।

'परीक्षा पे चर्चा' एक्झाम वॉरियर्स उपक्रमांतर्गत पार पडलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण शहरातील महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आज उत्साहात संपन्न झाले.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धेतील सहभागी आणि विजेत्यांना खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त ठरणा-या  साहित्यासह आकर्षक बक्षीसे  वितरित करण्यात आले.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा' या उपक्रमातून परळी शहरातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आल्यानंतर खा.प्रितमताई मुंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात, त्यांच्यासाठी स्पर्धा जीवघेण्या ठरू नयेत आणि त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळावी याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, नगरसेवक पवन मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Click:● *'परिक्षा पे चर्चा' : खा. डाॅ.प्रितम मुंडे म्हणाल्या - 'बी पॉझिटिव्ह'* MB NEWS ला नक्की SUBSCRIBE, like, share, comments करा.



स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नितीन समशेट्टी, महादेव इटके, उमेश खाडे,  अश्विन मोगरकर, पवन मोदाणी,सचिन गित्ते, मोहन जोशी, विकास हालगे, अरुण पाठक, योगेश पांडकर,अनिष अग्रवाल,गोविंद चौरे, राहुल घोबाळे,श्रीपाद शिंदे, सुशील हरंगुळे, दिलीप नेहरकर , वैजनाथ रेकणे यांच्यासह गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या टीमने परिश्रम घेतले. खा.प्रितमताई मुंडे यांनी परीक्षा पे चर्चा' टीमचे आणि परीक्षकांचे आभार मानले, यावेळी परीक्षकांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.


*स्पर्धकांना आकर्षक बक्षीसं* 

-----------------

चित्रकला स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांसाठी पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून आकर्षक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी इयत्ता दहावीतील कु. प्रेमा अमोल वानरे या विद्यार्थिनीस स्मार्टफोन, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या कु. गौरी पुरुषोत्तम कुकडे या विद्यार्थिनीस सायकल आणि तृतीय क्रमांक पटकावलेला विद्यार्थी चि. मुकुंद गंगाधर मुंडे यास स्मार्ट वॉच वितरित करण्यात आले. तसेच स्पर्धेतील सहभागी वीस विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ ड्रॉविंग किट आणि चाळीस विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर हॉटपॉटचे वितरण करण्यात आले.


*खा.प्रितमताईंच्या दिलखुलास संवादाने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता*

-------------

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिल्यानंतर खा.प्रितमताई मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्मार्टहार्ड वर्क या संकल्पनेला त्यांनी खास शैलीत मांडून विद्यार्थ्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासह व्यक्तिमत्व विकासावर देखील भर द्यावा असा विचार त्यांनी यावेळी मांडला. दरम्यान खा.प्रितमताईंच्या दिलखुलास आणि मुक्तसंवादाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण झाल्याचे चित्र कार्यक्रमस्थळी पाहायला मिळाले.

••••

Video:



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार