MB NEWS:भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 परळी औष्णिक विद्युत केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा 

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक  वाचन 


परळी प्रतिनिधी 


२६ जाने २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पी. एन. भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र सुरक्षा दल व मेस्कोच्या जवानांनी परेड सादर केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. 

याप्रसंगी  मुख्य अभियंता पी. एन. भदाणे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले कि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी आपल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून अमलात आणून नव्या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात केली. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले परंतु २६ जानेवारी १९५० पासून भारत देश लोकशाही गणतंत्र देश म्हणून जगभरात उदयास आला. भारत देशात लोकशाही पद्धतीने कामकाज सुरु झाल्याने प्रत्येक नागरिकास स्वतंत्र, समता, बंधुता व न्याय हि मानवी विकासाची मूल्य प्राप्त करण्यासाठी भारतीय संविधानाचा आधार घेऊन आपण वाटचाल करत आहोत. ज्ञान विज्ञानाच्या तंत्रज्ञानात जगभरात क्रांती झाली आहे. आपणही या तंत्रज्ञानाचा आधुनिक पद्धतीने वापर करून वीज निर्मितीत व विकासामध्ये योगदान देणारे सर्वच सैनिक, हुतात्म्यांना व महापुरुषांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. भदाणे पुढे म्हणाले कि आपली महानिर्मिती कंपनी कठीण परिस्थितून मार्गक्रमण करीत असून या परिस्थितीत सर्वानी आपली कर्तव्य जर चांगल्या प्रकारे पार पडली तर त्यातून भविष्यात येणाऱ्या सर्व जवाबदाऱ्या आपण चांगल्या प्रकारे पार पडून महानिर्मितीच्या भविष्य उज्वलतेकडे नेण्यासाठी व सर्वांगीन विकासासाठी वचनबद्ध राहू. प्रजासत्ताक दिनानिमित्त परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व अधिकारी, अभियंता, कर्मचारी, कंत्राटदार व कंत्राटी कामगार यांना शुभेच्छा त्यांनी दिल्या. शेवटी ते म्हणाले कि सर्वजण वीज निर्नितीचे महान राष्ट्रीय कार्य यापुढेही असेच अखंड सुरु ठेवण्यासाठी कठीबद्द राहू.  या प्रसंगी उप मुख्य अभियंता एच के अवचार, अधीक्षक अभियंता एस एन बुकतारे , आर पी रेड्डी, चंद्रकांत मोराळे, श्रीगणेश मुंडे, के एस तूपसागर, सुरक्षा अधिकारी सचिन पवार,कल्याणाधिकारी दिलीप वंजारी, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे, राजू गजलेआदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार