इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:पांगरी येथे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन

 पांगरी येथे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन  





परळी वैजनाथ दि.२८

        येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पांगरी येथे विशेष युवती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास युवती विशेष शिबीराचे आयोजन दि.२७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या विशेष युवती शिबीराचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२७) उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या हस्ते करण्यात आले.




 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे कोषाध्यक्ष प्रसाद देशमुख प्रमुख पाहुणे माजी सरपंच अक्षता सुशिल कराड, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ अमोल गंगणे, मंडळ अधिकारी मंगल मुंडे, माऊली मुंडे,दत्तराव कराड, नंदकिशोर मुंडे,अजित तिडके, महादेव कराड, सचिन तिडकेसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, गाडगेबाबा, सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना नम्रता चाटे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वतः चे ध्येय ठरवले पाहिजे, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी पारपाडण्यास मदत करते असे प्रतिपादन केले तर प्रा. डॉ अमोल गंगणे यांनी सांगितले की, कोणत्या गोष्टींची सुरुवात स्वतः पासून करा. प्रास्ताविक प्रा.डॉ विनोद जगतकर, प्राचार्य डॉ मुंडे, अध्यक्षीय समारोप प्रा.प्रसाद देशमुख यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कल्याणकर आभार प्रा डॉ दिग्रसकर यांनी मानले,कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ विनोद जगतकर, प्रा.प्रविण फुटके, प्रा.पौळ, प्रा.डॉ शहाणे, प्रा.भांगे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक,विद्यार्थी,शिक्षकेत्तर कर्मचारी,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या