इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचा उपक्रम

 काशी जगदगुरू डॉ.चंद्रशेखर महास्वामी यांच्या हस्ते संत गुरूलिंग स्वामी मंदीरास टयुब संच भेट




राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचा उपक्रम


परळी वैजनाथ/प्रतिनिधी

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती,परळीच्यावतीने वैद्यनाथ मंदीर जवळील संत गुरूलिंग स्वामी मंदीरास लागणारे टयुबसंच ज्ञानसिंहासनाधिश्वर श्रीश्रीश्री 1008 जगदगुरू डॉ.चंद्रशेखर महास्वामी, काशीपीठ यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ष.ब्र.नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज, सोनपेठकर, ष.ब्र.चंद्रशेखर शिवाचार्य महाराज,माजलगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

लिभेर अप्लांयसेस इंडीया प्रायव्हेट लिमिटेड,शेंद्रा,औरंगाबाद येथील कंपनीचे वरीष्ठ व्यवस्थापक श्री.किरण बेंडाळे यांच्याद्वारे  सामाजिक बांधिलकी जपत सीएसआर अंतर्गत मंदीरास लागणा-या टयुब संचाची उपलब्धता करून देण्यात आली.

याकरिता राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे, पदाधिकारी सचिन सौंदळे तसेच सर्व सदस्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला तसेच तपोनुष्ठान समितीचे सचिव तथा एस.पी.सप्लायर्सचे प्रो.प्रा.संतोष पंचाक्षरी यांच्यावतीने मंदीरातील सर्व टयुबसंचाची फिटींग करून योगदान देण्यात आले. यावेळी वैजनाथ देवस्थानचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे, मन्मथ स्वामी जन्मोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.सुरेश चौधरी, संत गुरूलिंग स्वामी मंदीराचे अध्यक्ष दत्ताअप्पा ईटके गुरूजी, सचिव अ‍ॅड.गिरीष चौधरी, नगरसेवक चेतन सौंदळे,अनिल अष्टेकर, रमेशअप्पा सपाटे, माजी नगरसेवक सोमनाथ निलंगे, महादेव ईटके, रमेश चौंडे, संजय स्वामी सर, संतोष पंचाक्षरी, आश्विन मोगरकर, दयानंद चौधरी,जगदीश मिटकर, मकरंद नरवणे, रमेश चौधरी सर, सोमनाथ गोपनपाळे, गजानन चौधरी, कैलास भिमाशंकरअप्पा रिकीबे, नितीन समशेट्टे, डॉ.योगीराज बर्दापुरे, बाबासाहेब शिगे, बाळू स्वामी,अशोकअप्पा झाडे,महेश वेरूळे, शिवकुमार चौंडे, संतोष चौधरी, शिवकुमार केदारी, विकास हालगे, संदीप चौधरी, मन्मथ नरवणे, नंदूअप्पा शेटे, योगेश स्वामी, अनिल चौधरी, महेश स्वामी, रत्नेश बेलुरे, निरंजन गौरशेट्टे यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!