MB NEWS:विद्यार्थी, भाविक व नागरिकांना त्रास होणार्‍या मेरूगिरी मार्गावरील घाण पाण्याची व्यवस्था करा

 विद्यार्थी, भाविक व नागरिकांना त्रास होणार्‍या मेरूगिरी मार्गावरील घाण पाण्याची व्यवस्था करा



अभयकुमार ठक्कर व सहकार्‍यांचे नगर परिषदेला निवेदन


परळी/प्रतिनिधी

बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणारे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेवून मेरूगिरी प्रदक्षिणा करणार्‍या भाविकांची संख्या जास्त असते. याच मार्गावर इमदादुल विद्यालयाच्या बाजूस असलेल्या नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने त्याचा त्रास विद्यार्थी, भाविक व नागरिकांना होत असून या घाण पाण्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर व त्यांच्या सहकार्‍यांनी आज निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परळी शहरातील मेरूगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. या ठिकाणी महात्मा बसवेश्वर कॉलनी, नवगण महाविद्यालय असून येथे मोठया प्रमाणात नागरीक राहतात. तसेच याच भागात इमदादुल विद्यालयाच्या बाजूस असणार्‍या नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने भाविक, विद्यार्थी व नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. या घाण पाण्यामुळे मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरत असून विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

नगर परिषद प्रशासनाने याकडे त्वरील लक्ष देवून ही नागरी समस्या त्वरीत सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांच्यासह युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्राचार्य अतुल दुबे सर, माजी तालुकाप्रमुख जगन्नाथ साळुंके, जेष्ठ नेते सतिश जगताप, माजी शहर संघटक संजय कुकडे, युवा सेनेचे विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी,शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी,  उप शहर प्रमुख किशन बुंदेले, छत्रपती शिवाजी चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, बबन ढेंबरे, अमित कचरे,सचिन लोढा, बजरंग औटी,मनिष जोशी,लक्ष्मण मुंडे,योगेश घेवारे,विजय पवार,माऊली मुंडे, नरेश मैड,योगेश जाधव, प्रकाश देवकर, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, जगदीश पवार, विकास देवकर, सुधाकर बारसकार यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !