MB NEWS:युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनचा देशव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप

 युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनचा देशव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप




परळी प्रतिनिधी 


बँक ऑफ महाराष्ट्र मधील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनानी मिळून एकत्रित येऊन स्थापन केलेल्या युनायटेड फोरम ऑफ महा बँक युनियन च्या वतीने दिनांक २७ जानेवारी रोजी एक दिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर देण्यात आली आहे. 

    गेल्या १० वर्षात बँकेचा व्यवसाय २५०० पटीने वाढला आहे. ४५० नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत तर कर्मचाऱ्याची संख्या मात्र २०% ने कमी झाली आहे. बँक गेल्या अनेक वषार्पासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा या मुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील भरत नाही याचा परिणाम म्हणून लोकांना रोज जास्त वेळ काम करावे लागते. सुट्टीच्या दिवशी देखील कामावर यावे लागते यामुळे कौटुंबिक जबाबदान्या पार पाडणे अशक्य झाले आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतआहे. त्यांच कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे समाधानकारक ग्राहक सेवा देता येणे अशक्य झाले आहे. याचा बँकेच्या व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत आहे.

     महा बँकेतील कर्मचारी विलक्षण मानसिक तणावातून जात आहेत सर्व संघटनानी या प्रश्नी आपली कैफियत वारंवार माडली पण व्यवस्थापनयाला कुठलाच प्रतीसाद देत नाही हे लक्षात घेतानाईलाजाने संघटनानी शेवटचा मार्ग म्हणून शेवटी २७ जानेवारी संपाची हाक दिली आहे.शेवटचा मार्ग म्हणून डेप्युटी चीफ लेबरकमीशनर मुंबई यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण व्यवस्थापनाच्या आडमुठेपणा मुळे कुठलीही तडजोड घडुन आली नाही.या संपामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दलसंघटनेच्या वतीने दिलगीरी व्यक्त करण्यात येत आहेव असे आवाहन करण्यात येत आहे की उत्तम ग्राहक सेवेची गरज म्हणून नोकर भरती या त्यांच्या मागणीला ग्राहकांनी पाठिंबा द्यावा.

     याचा परिणाम म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र परळी वैजनाथ मार्केट मधील शाखेसमोर संपाच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी निर्देशने, कार्यक्रम संघटीत करून व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांना आपला तीव्र विरोध प्रदर्शित केला. या संपात महा बँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी यांनीही सहभाग नोंदवला त्यामुळे बँकेचे कामकाज पूर्ण ठप्प झाले. महाबँकेच्या देशव्यापी संपात बँकेतील कर्मचारी सुमंतकुमार,जयश्री गोस्वामी, भाग्यश्री साखरे,पूजा देशमुख,बालाजी डवरे,शिवरत्न आघाव, दिपक घाडगे,विलास जोशी सहभागी झाले आणि संप यशस्वी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार