इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 बाळासाहेबांच्या विचारांची धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर मोहिनी-वैजनाथ माने




बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन



परळी (प्रतिनिधी):- बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांच्या विचाराची धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर  मोहिनी होती. त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि 70 च्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख पद मिळताच आपले घरदार नातेवाईक सोडून कार्यालयालाच आपलं घर केलं होतं. आपलं उभ आयुष्य त्यांनी शिवसेनेसाठी समर्पित केले होते. असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे परळी शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय अरुणोदय मार्केट येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.



धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती बाळासाहेबांची  शिवसेना पक्षाच्या वतीने परळी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी परळी शहरप्रमुख वैजनाथ माने, युवा सेना शहर प्रमुख गजानन कोकीळ, उपतालुकाप्रमुख सोमेश्वर गीते,युवासेना उपशहर प्रमुख नितीन केंद्रे, ज्येष्ठ नेते सखारामजी फकिरे, उपशहर प्रमुख ऍड.संजय डिगोळे, उपशहर प्रमुख बाळासाहेब खोसे, ऍड. राहुल सोळंके, जीवन अन्ना शिंदे, भारत आसेवार, ज्येष्ठ नेते नारायण पांचाळ, युवराज सोळंके,अनिकेत माने, विठ्ठल गायकवाड यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना वैजनाथ माने म्हणाले की, शिवसेनेला ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात आनंद दिघे यांच्या रूपानं फुलटाईम कार्यकर्ता मिळाला होता. दिघेंच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली होती. दिघेंच्या घरी आई, भाऊ आणि बहीण असा परिवार होता. परंतु जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आल्यावर त्यांनी घर वगैरे सगळं दूर केलं. जिथं कार्यालय होतं, तिथंच ते राहायचे, तिथंच झोपायचे. कार्यकर्ते त्यांना डबा आणून द्यायचे,"एवढं मोठं समर्पण त्यांनी शिवसेनेच्या पक्ष वाढीसाठी व कार्यकर्त्यासाठी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन युवा सेनेचे शहर प्रमुख गजानन कोकीळ यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिकेत माने यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!