इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS: सौ.गंगाबाई आश्रुबा काळे यांचे निधन;आश्रुबा दादा काळे यांना पत्निशोक

 सौ.गंगाबाई आश्रुबा काळे यांचे निधन;आश्रुबा दादा काळे यांना पत्निशोक

परळी (प्रतिनिधी)

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आश्रुबा दादा काळे यांच्या पत्नी सौ.गंगाबाई आश्रुबा दादा काळे यांचे शनिवारी पहाटे दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 67 वर्षे होते.


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आश्रुबा दादा काळेआश्रुबा दादा काळे यांच्या पत्नी सौ.गंगाबाई आश्रुबा काळे यांचे आज पहाटे अल्पशा अजाराजे दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शांत, संयमी, सुसंस्कृत आणि धार्मिक स्वभावामुळे त्यांचा लौकिक होता. सौ.गंगाबाई काळे यांच्या पश्चात पती अश्रूबा दादा काळे, मुले शिवाजीराव काळे, पांडुरंग काळे, दोन मुली, सूना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. पौळ पिंपरी येथे आज 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या